अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 02:14 AM2018-02-18T02:14:35+5:302018-02-18T02:23:06+5:30

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये सहाव्या टप्प्यात शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

Akola: Spontaneous response to Morna Cleanliness campaign! | अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Next
ठळक मुद्देमहिला बचत गट, वस्ती स्तर संघांचा हातभार!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये सहाव्या टप्प्यात शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यामुळे मोर्णा स्वच्छता मोहिमेला अकोलेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
 सहाव्या टप्प्यात शनिवारी सकाळी ८ ते ११.३0 वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी  नागरिकांची गर्दी झाली होती.  मोर्णा स्वच्छता मोहिमेत खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले, उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, उपजिल्हाधिकारी राजेश खवले, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, उपमहापौर वैशाली शेळके, नगरसेविका गीतांजली शेगोकार, उषा विरक, नगरसेवक हरीश आलीमचंदाणी, माजी महापौर सुमन गावंडे, मनपा अतिरिक्त दीपक पाटील, भाजपचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, शहर सचिव वर्षा गावंडे, अंजली जोशी, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, ‘निमा’चे डॉ.संजय तोष्णीवाल, डॉ.मिलिंद बडगुजर, डॉ.माया ठाकरे, डॉ.अरविंद गुप्ता, अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीरसाहेब यांच्यासह डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, वस्ती स्तर संघ आणि स्वयंसेवी संस्था व सामाजिक संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत नदीपात्रातील जलकुंभी व कचरा काढण्यात आला. 

महिला बचत गट, वस्ती स्तर संघांचा हातभार!
 मोर्णा स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध महिला बचत गट आणि वस्ती स्तर संघांच्या पदाधिकारी-सदस्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हातभार लावला. त्यामध्ये प्रामुख्याने श्रद्धा वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष सुनंदा शिंदे, माउली वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष अनिता मारवाल, तेजस्विनी वस्ती स्तर संघाच्या प्रतिभा नागदेवते यांच्यासह संजीवनी महिला बचत गट, दादाजी महिला बचत गट इत्यादी महिला बचत गट व वस्ती स्तर संघाच्या पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला.

‘या’ संस्था, संघटनांनी घेतला सहभाग!
मोर्णा स्वच्छता मोहिमेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी, संकल्प प्रतिष्ठान,  रोटरी क्लब, सेवा फाउंडेशन, नॅशनल मोबाइल मेडिकल युनिट, बुद्धगया धम्ममित्र सेवा संघ, जनता कंझ्युमर सोसायटी, भावसार महिला मंडळ, पराग गवई यांच्यासह मित्र मंडळ,लघुव्यावसायी व्यापारी संघटना, शौर्य फाउंडेशन, दीपक सदाफळे यांच्यासह संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, गांधी चौक नवयुवक मंडळ, लोक सेवा संघ, क्रीडा भारती, जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघ, ऊर्जापर्व संघटना, ज्योती जानोरकर विद्यालय, आरडीजी पब्लिक स्कूल, हिंदू ज्ञानपीठ, डॉ. हेगडेवार माध्यमिक शाळा, चौधरी विद्यालय, आदर्श विद्यालय, गुरूनानक कॉन्व्हेंटचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, गायत्री बालिका आश्रम, पोलीस पाटील संघटना, महसूल कर्मचारी संघटना, बाराभाई गणपती सेवा मंडळ, मूर्तिजापूर महसूल कर्मचारी स्वच्छता अभियान पथक, स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन विक्रेता संघटना, विदर्भ पटवारी संघटना, महसूल मंडळ अधिकारी संघटना, प्रेरणा भूमी संघ व इतर संस्था, संघटना व पथकांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

Web Title: Akola: Spontaneous response to Morna Cleanliness campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.