अकोला : वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी सरसावला ‘प्रहार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:45 PM2018-01-10T13:45:27+5:302018-01-10T13:53:29+5:30

अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या तीन नवनियुक्त विविध विभागांच्या जिल्हाप्रमुखांनी अकोला जिल्ह्यातील अन्वी मिझार्पूर येथील एका वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी धाव घेतली.

Akola: Prahar take initiative for The elderly lady | अकोला : वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी सरसावला ‘प्रहार’

अकोला : वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी सरसावला ‘प्रहार’

Next
ठळक मुद्देघरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी अन्नपूणार्बार्इंनी गेल्या १० महिन्यांत सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. अखेर त्यांनी न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली व पाठपुरावा करून आजीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला.


अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या तीन नवनियुक्त विविध विभागांच्या जिल्हाप्रमुखांनी अकोला जिल्ह्यातील अन्वी मिझार्पूर येथील एका वयोवृद्ध महिलेला घरकुल मिळवून देण्यासाठी धाव घेतली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने योग्य ती कार्यवाही करुन आजीबार्इंना घरकुल मिळवून देण्याचे लेखी आश्वासन दिले. या आश्वासनामुळे आजीबार्इंचा जीव अखेर भांड्यात पडला आहे!
अन्वी मिझार्पूर येथील रहिवासी अन्नपूणार्बाई बागडे या वयोवृध्द आजीबाई अनेक वषार्पासून या गावात राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखिची आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला घर’ या महत्वकांक्षी योजने अंतर्गत अन्नपूणार्बाई बागडे यांनीही घरकुलासाठी अर्ज केला. त्या घरकुलासाठी पात्रदेखील ठरल्या. त्यांनी घरकुलाचे काम करायला सुरूवात करावी यासाठी शासनाने त्यांना बांधकामाचा पहिला हप्ता मंजूर करुन दिला; मात्र काही कारणास्तव त्यांचा दुसरा हप्ता रोखला गेला व घरकुलाचे काम थांबले. घरकुलाचा दुसरा हप्ता मिळावा यासाठी अन्नपूणार्बार्इंनी गेल्या १० महिन्यांत सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. मात्र, त्या घरकुलाच्या दुसºया हप््त्याापासून वंचित राहिल्या. अखेर त्यांनी न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
यासंदर्भात माहिती मिळताच प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनियुक्त अकोला महानगर जिल्हाध्यक्ष प्रशांत भारसाकळ, ग्रामीण युवक आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास साबे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम पिठलोड यांनी उपोषणास्थळी जाऊन, आजीची आस्थेने विचारपूस केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली व पाठपुरावा करून आजीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. सत्य परिस्थिती लक्षात येताच शासकीय अधिकाºयांनी सुध्दा अन्नपूणार्बाई बागडे यांना लवकरात - लवकर योग्य ती कार्यवाही करु, असे लेखी आश्वासन दिले. त्यापृष्ठभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने वयोवृद्ध अन्नपूर्णाबार्इंचे उपोषण सोडविण्यात आले.
याप्रसंगी अन्वी मिझार्पुरचे उपसरपंच प्रशांत नागेड, प्रहारचे युवक आघाडी पश्चिम विभाग शहर अध्यक्ष संतोष पाटील, युवक आघाडी पूर्व विभाग शहर अध्यक्ष गोविंद गिरी, युवक आघाडी ग्रामीण उपाध्यक्ष अमोल खोबरखेडे, प्रहारचे माजी महानगर अध्यक्ष बाळू ढोले पाटील, प्रहार सोशल मिडीया प्रसारमाध्यम जिल्हाध्यक्ष डी. आर.देशमुख, प्रहार महिला आघाडी महानगर अध्यक्षा नम्रता ठोकळ, महिला आघाडी महानगर उपाध्यक्षा सविता शेळके, आरोग्य सेवा समिती अकोला जिल्हाध्यक्ष श्रीधर कराळे, प्रहार आरोग्य सेवा समिती मनपा क्षेत्र जिल्हाप्रमुख संदीप तवर यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे अन्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Akola: Prahar take initiative for The elderly lady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.