अकोला : ‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लेखनातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 07:42 PM2018-01-30T19:42:28+5:302018-01-30T19:46:04+5:30

अकोला : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून, प्रभात किड्स स्कूल येथे उत्स्फूर्त काव्य लेखन  स्पध्रेचे ३0 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ६३ सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काव्यलेखनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिनव रीतीने श्रद्धांजली वाहिली. 

Akola: 'Prabhat' students commemorate tribal writings from spontaneous writings! | अकोला : ‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लेखनातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली!

अकोला : ‘प्रभात’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त लेखनातून वाहिली हुतात्म्यांना श्रद्धांजली!

googlenewsNext
ठळक मुद्देहुतात्मा दिनाचे औचित्य; प्रभात किड्स स्कूलमध्ये पार पडली काव्य लेखन स्पर्धाकाव्यरचनांमधून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून, प्रभात किड्स स्कूल येथे उत्स्फूर्त काव्य लेखन  स्पध्रेचे ३0 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ६३ सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काव्यलेखनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिनव रीतीने श्रद्धांजली वाहिली. 
‘प्रभात’च्या सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत ‘भारत माता’, ‘अहिंसा-जीवनाचा मार्ग’, ‘स्वातंत्र्य योद्यांना नमन’, ‘आम्हास शांती हवी’ यासह अन्य विषयांवर सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तरीतीने काव्य लेखन केले. या अभिनव उपक्रमाच्या प्रारंभी प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, प्राचार्य कांचन पटोकार, उपप्राचार्य वृषाली वाघमारे यांच्यासह शिक्षक वृंदांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच संपूर्ण शाळेने दोन मिनीटे मौन पाळून महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांच्या मार्गदर्शनात कांचन नारखेडे, मुकुंद माळवे, संजय पाटील, रोहन गवळी यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Akola: 'Prabhat' students commemorate tribal writings from spontaneous writings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.