अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:36 AM2017-12-29T01:36:33+5:302017-12-29T01:36:40+5:30

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे भाग्य २५0 मतदार ठरविणार आहेत.

Akola: Polling for seven seats of District Planning Committee today | अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी आज मतदान

अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या सात जागांसाठी आज मतदान

Next
ठळक मुद्दे१५ उमेदवारांचे भाग्य ठरविणार २५0 मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी  शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे भाग्य २५0 मतदार ठरविणार आहेत.
 जिल्हा नियोजन समितीच्या १४ सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मतदारसंघातून चार, महानगरपालिका मतदारसंघातून सात व नगरपालिका मतदारसंघातून तीन सदस्यांची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत सात उमेदवारांची अविरोध निवड झाली आहे. त्यामुळे सात जागांसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. सात जागांसाठी  १५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, उमेदवारांचे भाग्य पसंतीक्रमाच्या मतदान प्रक्रियेत २५0 मतदार ठरविणार आहेत. या निवडणुकीसाठी अकोल्यातील तीन केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर एक तहसीलदार मतदान केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी याप्रमाणे तीनही मतदान केंद्रांवर गुरुवारी मतदान पथके रवाना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागामार्फत मतदानाची तयारी पूर्ण करण्यात आली असून, मतमोजणी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात होणार आहे, असे नायब तहसीलदार (निवडणूक ) सतीश काळे यांनी सांगितले.

या’ केंद्रांवर  होणार मतदान!
डीपीसी निवडणुकीसाठी अकोला शहरातील तीन मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एक जागेसाठी अकोला तहसील कार्यालय सभागृह येथे, महानगरपालिका मतदारसंघातील ४ जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृह येथे आणि नगरपालिका मतदारसंघातील २ जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सेतू सभागृह येथे मतदान घेण्यात येणार आहे.

निवडणूक रिंगणात असे आहेत उमेदवार! 
जिल्हा परिषद मतदारसंघात अनुसूचित जाती प्रवर्गातून एका जागेसाठी महादेव गवळे व सरला मेश्राम, मनपा मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी शारदा ढोरे, शीतल गायकवाड व खान शहीन अंजुम महेबूब आणि सर्वसाधारण प्रवर्गातून दोन जागांसाठी महापौर विजय अग्रवाल, राजेंद्र गिरी व मंगेश काळे तर नगरपालिका मतदारसंघात सर्वसाधारण प्रवर्गातून एका जागेसाठी राजेश खारोडे, मुशीरुल हक अमीरुल हक, नासीर हुसेन सफदर हुसेन, मीतेश मल्ल आणि नामाप्र स्त्री प्रवर्गातून एका जागेसाठी रेशमा अंजुम अफजलखा, गंगा चंदन, सुनीता भुजबले इत्यादी १५ उमेदवार आहेत. 

‘डीपीसी’वर  नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती
जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या नियोजन विभागामार्फत बुधवारी काढण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समितीमध्ये विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती शासनाच्या नियोजन विभागामार्फत करण्यात येते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीवर नऊ विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश नियोजन विभागामार्फत काढण्यात आला. त्यामध्ये भाजपाचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी राज्यमंत्री वसंतराव धोत्रे, नगरसेवक हरीश आलिमचंदाणी, गणेश तायडे, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा, माजी उपजिल्हाप्रमुख सेवकराम ताथोड व रा.स्वं. संघाचे नगरसंघचालक गोपाल खंडेलवाल यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Akola: Polling for seven seats of District Planning Committee today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.