Akola police leave for Puducherry with theft of a car | कार चोरीतील आरोपीस घेऊन अकोला पोलीस पुदूच्चेरीला रवाना

ठळक मुद्देअकोला शहरातून मोठय़ा प्रमाणात कार चोरीच्या घटनाया प्रकरणात अटकेत असलेल्या पुदूच्चेरी येथील आरोपीस १४ दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार्‍या  पुदूच्चेरी येथील एकास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याला घेऊन पोलिसांचे एक पथक पुदूच्चेरीला येथे रवाना झाले आहे. सदर आरोपीस न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 
शहरातून मोठय़ा प्रमाणात कार चोरीला गेल्या आहेत. त्यात सात तवेरा वाहनांचा समावेश असून, इनोव्हा व आणखी काही कारचा समावेश आहे. या वाहनांचा तपास गत अनेक दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नागरे यांनी दोन पीएसआयसह १0 पोलिसांचे पथक गत १५ दिवसांपूर्वी पुदूच्चेरीला पाठविले होते.  पुदूच्चेरी येथून पथकाने मुरगन ऊर्फ मशिलामनी एकाबरन नावाच्या इसमाला ताब्यात घेतले. अकोल्यातून कार चोरून नेऊन त्यांची विल्हेवाट पुदूच्चेरीत लावण्याचे काम याच्या माध्यमातून होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर पोलीस त्यांना पुदूच्चेरीला  घेऊन गेले आहेत. चोरीच्या काही कार या चोरट्याकडून मिळण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.