अकोला :तत्कालीन नगराध्यक्ष, ‘सीओं’च्या चौकशीचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:40 AM2018-03-07T01:40:12+5:302018-03-07T01:40:12+5:30

अकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी रोजी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मोहोड यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत.

Akola: Order of inquiry of the then mayor, 'CO' | अकोला :तत्कालीन नगराध्यक्ष, ‘सीओं’च्या चौकशीचा आदेश

अकोला :तत्कालीन नगराध्यक्ष, ‘सीओं’च्या चौकशीचा आदेश

Next
ठळक मुद्दे अकोट न्यायालयाचा आदेश रस्ता, नाली व भिंंतीचे निष्कृष्ट काम करून अपहार केल्याचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नगर परिषदतर्फे करण्यात आलेल्या कामाची चौकशी करून कारवाई करावी, याकरिता निवेदन दिल्यानंतरही कारवाई होत नसल्याने अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणी तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, अभियंता, कंत्राटदार यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचा आदेश २६ फेब्रुवारी रोजी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश मनोज मोहोड यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत.
अकोट येथील कंत्राटदार शिवाजी केशवराव देशमुख, तत्कालीन मुख्याधिकारी समीर गुंजारीलाल लाठी, तत्कालीन अभियंता विलास चंद्रभान बोरकर, तत्कालीन नगराध्यक्ष रामचंद्र टिकाराम बरेठिया, तत्कालीन नगरसेवक अफजल खान अमरुल्ला खान, रेशमा अंजुम अफजल खान, सादेकाबी इफ्तेखार अहेमद  यांच्याविरुद्ध अकोट येथील अब्दुल जमीर अब्दुल कादीर रा. अकबरी प्लॉट यांनी कलम १५६ (३) अंतर्गत अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. त्यामध्ये संबधीतांनी अकोट नगर परिषद अंतर्गत सन २०१४ मध्ये अंजनगाव रस्त्याला लागून असलेल्या उर्दू स्कूल ते मौलाना आझाद स्कूलपर्यंतच्या रस्त्यात व इतर ठिकाणी असलेल्या नाली व भिंतीच्या कामात अपहार करून आर्थिक लाभ घेतला, लोकांची फसवणूक करून जनतेचा विश्वासघात केला. तसेच खोटी बिले तयार करून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप अब्दुल जमीर अब्दुल कादीर यांनी केला होता. याविषयी त्यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सुद्धा निवेदन देऊन उपोषण केले होते. त्यावर जिल्हाधिकाºयांनी प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय गुणनियंत्रक विभाग अमरावती यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार गुणनियंत्रण विभागाने आपला अहवाल सादर केला होता. तसेच यासंदर्भात अकोट एस.डी.ओ. यांनी सुद्धा चौकशी करून जिल्हाधिकाºयांना अहवाल दिला होता. त्यानंतर ३१ आॅगस्ट २०१६ ला अकोट शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने पोलीस अधीक्षक, अमरावती पोलीस महानिरीक्षक यांना दखलपात्र गुन्हा नोंदविण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. तरी सुद्धा अपहार प्रकरणात सहभाग असलेल्यांवर कारवाई झाली नाही. कारवाई होत नसल्याने या प्रकरणी अब्दुल जमीर अब्दुल कादीर  यांच्या वतीने अ‍ॅड.नजीब शेख यांनी अकोट येथील न्यायालयात प्रकरण दाखल केली. तसेच अपहार प्रकरणात सहभागी असलेल्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे, याकरिता आदेश देण्यात यावे, अशी विनंती केली होती. या प्रकरणी अकोट न्यायालयाचे न्यायाधीश यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Akola: Order of inquiry of the then mayor, 'CO'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.