अकोला महापालिकेचा आकृतिबंध रखडला; कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:55 PM2018-10-16T12:55:03+5:302018-10-16T12:55:07+5:30

अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदूनामावली आणि सरळ सेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके ...

Akola municipal corporation's formation stops; Employees' posts vacant | अकोला महापालिकेचा आकृतिबंध रखडला; कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

अकोला महापालिकेचा आकृतिबंध रखडला; कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

Next

अकोला: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदूनामावली आणि सरळ सेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी किती आहेत, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली होती. अजय लहाने यांची बदली होताच ही प्रक्रिया ठप्प पडली असून, कर्मचाºयांच्या रिक्त पदांमुळे प्रशासनाने आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे. संबंधित एजन्सीला दिल्या जाणारे मोठ्या रकमेचे देयक पाहता आउटसोर्सिंगच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
महापालिकाच नव्हे तर इरतही प्रशासकीय यंत्रणांमध्ये तेथील उपलब्ध कर्मचाºयांच्या संख्येनुसार कामकाज पार पडते. अर्थात, त्या-त्या विभागात कार्यरत कर्मचारी किती आणि ते कोणत्या संवर्गातील आहेत, ही बाब महत्त्वाची ठरते. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत मागील १५ वर्षांपासून रखडलेल्या बिंदूनामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिल्याने बिंदूनामावली अंतर्गत सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपाच्या जलप्रदाय विभाग, नगररचना, बांधकाम आदी विभागात तांत्रिक संवर्गातील कर्मचाºयांची अपुरी संख्या पाहता प्रशासनाने तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले होते. यादरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण कर्मचारी किती आणि विभागवार कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याची अचूक माहितीच प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले. ही बाब पाहता महापालिकेचा आकृतिबंध तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. आकृतिबंधाची प्रक्रिया क्लिष्ट असली तरी त्याची गरज ओळखून सामान्य प्रशासन विभागामार्फत ही प्रक्रिया २०१६ मध्ये सुरू करण्यात आली होती. अवघ्या दोन-तीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागातील जुजबी माहिती प्रशासनाकडे सादर केल्यानंतर ही प्रक्रिया ठप्प पडल्याचे चित्र आहे.

मनपाची घडी विस्कटलेली!
महापालिकेत जन्म-मृत्यू विभाग, सार्वजनिक बांधकाम, जलप्रदाय, नगररचना विभाग, शिक्षण विभाग, कोंडवाडा, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभाग, अर्थ व वित्त विभाग, आरोग्य व स्वच्छता, वैद्यकीय आरोग्य यंत्रणा आदी विभागांमध्ये पात्रता नसणाºया कर्मचाºयांकडे महत्त्वाचे पदभार सोपविण्यात आले आहेत. त्यांच्या अधीनस्थ किती कर्मचारी कोणत्या पदांवर कार्यरत आहेत, याबाबत सावळा गोंधळ आहे. याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.


कर्मचाºयांचा मनमानी कारभार
महापालिकेचा आकृतिबंध तयार नसल्यामुळे कामचुकार कर्मचाºयांमध्ये आनंदी आनंद आहे. अनेक कर्मचारी बिळात दडून बसल्यासारखे विविध विभागांमध्ये कार्यरत आहेत. मनपाच्या आस्थापनेवरील २ हजार २०० कर्मचारी पाहता बहुतांश कर्मचारी दिवसभर असतात तरी कोठे, असा सवाल उपस्थित होतो. अशा क ामचुकार कर्मचाºयांच्या मुसक्या आवळण्यासाठी आकृतिबंध मंजूर होणे नितांत गरजेचे झाले आहे.

 

Web Title: Akola municipal corporation's formation stops; Employees' posts vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.