महाबीजच्या संचालकपदी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पाचव्यांदा विजयी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 07:06 PM2018-01-20T19:06:23+5:302018-01-20T19:11:21+5:30

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.

Akola MP Sanjay Dhotre won for fifth time as Mahabeej's director! | महाबीजच्या संचालकपदी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पाचव्यांदा विजयी !

महाबीजच्या संचालकपदी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पाचव्यांदा विजयी !

Next
ठळक मुद्देविदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले.त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.उर्वरित महाराष्ट्रातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूरचे वल्लभराव देशमुख हे अविरोध निवडून आले.

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीजच्या)संचालकपदी विदर्भ मतदार संघातून अकोल्याचे खासदार संजय धोत्रे ९,४०६ मतांनी विजयी झाले. त्यांनी लोकजागर मंचाचे उमेदवार प्रशांत गांवडे यांचा ५,४२३ मतांनी पराभव केला.तसेच उर्वरित महाराष्ट्रातून  बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूरचे वल्लभराव देशमुख हे अविरोध निवडून आले. देशमुख आणि धोत्रे हे दोघेही पाचव्यांदा महाबीजच्या संचालकपदी विजयी झाले.
संपुर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या महाबीजच्या कृषक भागधारकांनी महाबीजच्या विदर्भ व उर्वरित महाराष्टÑासाठी संचालक मंडळावर दोन संचालक निवडून द्यायचे होते.१३ जानेवरी रोजी निवडणूक झाली, २० जानेवरी रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल महाबीजचे निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांनी विदर्भ विभाग मतदारसंघातून खासदार संजय धोत्रे यांना विजयी तर उर्वरित महाराष्ट्रातून वल्लभराव देशमुख अविरोध विजयी घोषित केले. या संचालक पदासाठी टपाल मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्यात आली. विदर्भ मतदार संघातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा व बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व नांदुरा तालुक्यातील सर्व कृषक भागधारक मतदान मतदान केले. तर उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून वल्लभराव देशमुख रिंगणात होते त्यांना परभणी, हिंगोली,लातूर,नांदेड,सोलापूर,उस्मानाबाद,जालना, बीड,औरंगाबाद,अहमदनगर,पुणे,जळगाव,धुळे,नाशिक,नंदूरबार,कोल्हापूर,सांगली,सातारा,ठाणे व मंबई तसेच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव व नांदुरा वगळून सर्व तालुक्यातील सर्व कृषक भागधारकांना संचालक निवडून द्यायचे होते.तथापि उर्वरित मतदार संघातून दर्शन वल्लभराव देशमुख अमडापूर,किशोर बापू वाणी(जवाहर रोड ,पारोळा, जी. जळगाव),हरिभाऊ श्रीराम येवले (महिमाळ,ता. चिखली,जि.बुलडाणा) या तिघांनी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक न होता वल्लभराव देशमुख अविरोध निवडूण आले.या दोन्ही संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी विनय वर्मा यांच्याहस्ते पुढील तीन वर्षासाठी महाबीजचे संचालक म्हणून प्रमाणपत्र दिले.
यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावकर, महापौर विजय अग्रवाल,भाजपाचे शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, मनपा स्थायी समिती सभापती बाळ टाले यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

विदर्भात ३,४६९ भागधारक
विदर्भ मतदार संघात ३,४६९ कृषक भागधारक आहेत. या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. या मताचे मूल्य १३,७२१ एवढे होते. यापैकी संजय धोत्रे यांना ९,४०६ तर प्रशांत गांवडे यांना ३,९८३ मते पडली. या मतांची बेरीज १३,३८९ एवढी आहे तर ३३२ मतदाराचे मत अवैध ठरले.

Web Title: Akola MP Sanjay Dhotre won for fifth time as Mahabeej's director!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.