अकोला एमआयडीसी : एलईडी बल्ब बनविणार्‍या ‘एमआयडीसी’तील कारखान्यात आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:37 AM2018-02-06T01:37:04+5:302018-02-06T01:37:17+5:30

अकोला : एमआयडीसी क्रमांक तीनमधील एलईडी बल्बची निर्मिती करणार्‍या आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेडच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. आगीमध्ये कारखान्यातील एलईडी बल्बसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले.

Akola MIDC: Fire in the factory of MIDC, which produces LED bulb | अकोला एमआयडीसी : एलईडी बल्ब बनविणार्‍या ‘एमआयडीसी’तील कारखान्यात आग

अकोला एमआयडीसी : एलईडी बल्ब बनविणार्‍या ‘एमआयडीसी’तील कारखान्यात आग

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचे साहित्य जळून खाक : शॉर्ट सर्किटमुळे लागली आग 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एमआयडीसी क्रमांक तीनमधील एलईडी बल्बची निर्मिती करणार्‍या आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेडच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. आगीमध्ये कारखान्यातील एलईडी बल्बसह इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले. एमआयडीसीमध्ये एलईडी बल्बसह इलेक्ट्रॉनिक साहित्य बनविण्याची आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या कारखान्यात एलईडी बल्ब आणि इतर साहित्य ठेवलेले होते. रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. पाहता-पाहता, आगीने रौद्ररूप धारण केले. संपूर्ण कारखान्यातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारखानाच बेचीराख झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाला सूचना मिळताच, त्यांनी घटनास्थळ गाठून आगीवर पाण्याचा मारा केला आणि आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग नियंत्रण येत नव्हती. कारखान्यातील आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी पाण्याचे २0 बंब वापरले. मनपा अग्निशमन दलाच्या चार गाड्यांसह मूर्तिजापूर, अकोट आणि पातूर नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाच्या बंबांनाही पाचारण करण्यात आले होते. पाण्याच्या २0 बंबांचा मारा केल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीमध्ये कारखान्यातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी नोंद केली असून, तपास सुरू आहे.
 

Web Title: Akola MIDC: Fire in the factory of MIDC, which produces LED bulb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.