अकोला : बनावट स्वाक्षरी करून भूखंडाचा दिला ताबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:25 AM2018-01-13T11:25:39+5:302018-01-13T11:27:04+5:30

अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Akola: By making fake signature possession of possession! | अकोला : बनावट स्वाक्षरी करून भूखंडाचा दिला ताबा!

अकोला : बनावट स्वाक्षरी करून भूखंडाचा दिला ताबा!

Next
ठळक मुद्देतत्कालिन जिल्हाधिकार्‍यांची केली स्वाक्षरी

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्‍यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 

नायब तहसीलदार प्रीती सदाशिव लुटे (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शहरातील नझुल शिट क्र. २७ प्लॉट नं. ७११९ क्षेत्र ५ हजार ९४९ चौ. फूट  भूखंडाच्या मूळ कागदपत्रांची पाहणी केली असता, तत्कालीन जिल्हाधिकारी अनुप कुमार व तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी सचिन कलंत्री यांच्या स्वाक्षरीने हा भूखंड पडताळणी वाणिज्य प्रयोजनार्थ कन्हैयालाल मोतीलाल लोहिया यांना स्थायी पट्टय़ांवर मंजूर करण्यात आल्याचे दिसून आले. परंतु, या दोन्ही तत्कालिन अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षरी कागदपत्रांवर करून या भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस दिल्याचा प्रकार नायब तहसीलदार प्रीती लुटे यांच्या लक्षात आला. अज्ञात व्यक्तीने २00३-0४ या वर्षात चित्रपटगृहाबाबतच्या उपलब्ध कागदपत्रांवर या अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षरी करून शासनाची फसवणूक केल्याबाबत त्यांनी या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूद्ध तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला. 

Web Title: Akola: By making fake signature possession of possession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.