अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:02 PM2019-05-24T14:02:51+5:302019-05-24T14:03:50+5:30

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे.

Akola Lok Sabha election results 2019: More voting for NOTA than independents | अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019: अपक्षांपेक्षा ‘नोटा’ला अधिक मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत अपक्षांपेक्षा वरील ‘पैकी कोणीही नाही’ (नोटा)ला अधिक पसंती अकोलेकर मतदारांनी दर्शविली आहे. अपक्ष असलेल्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त म्हणजे, २५७९ मते सचिन शर्मा यांना पडली; मात्र या मतांपेक्षा अकोलेकरांनी ८८४४ मते नोटाला दिली आहेत.
निवडणूक मतदार संघात एकही उमेदवार पसंतीचा नसेल तर नोटाची सुविधा ‘ईव्हीएम’वर दिली आहे. त्याचा

पुरेपूर वापर अकोलेकरांनी केला आहे. अकोला लोकसभा मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी पाच उमेदवार अपक्ष आणि सहा उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते. या अकराही उमेदवारांना नाकारून ८८४४ अकोलेकर मतदारांनी नोटाचे बटन दाबले आहे. अपक्ष असलेल्या पाचही उमेदवारांपैकी एकालाही आठ हजाराच्या पलिकडे मते पडली नाहीत. अपक्षांपेक्षा अकोलेकरांनी नोटाला अधिक पसंती दर्शविल्याचे चित्र या मतमोजणीतून समोर आलेल्या आकडेवारीतून दिसत आहे.

कोणाला किती मते?
अपक्ष उमेदवार                  मते
अरूण ठाकरे                    १५२८
गजानन हरणे                  १२७२
प्रवीण कौरपुरिया              ९६३
मुरलीधर पवार                 २१३४
सचिन शर्मा                      २५७९
नोटा                                 ८८४४

 

 

Web Title: Akola Lok Sabha election results 2019: More voting for NOTA than independents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.