अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंचा विजय निश्चित; आंबेडकर दुसऱ्या, तर पटेल तिसऱ्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:30 PM2019-05-23T20:30:41+5:302019-05-23T20:34:25+5:30

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांचा ...

Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre win confirm in Akola | अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंचा विजय निश्चित; आंबेडकर दुसऱ्या, तर पटेल तिसऱ्या स्थानावर

अकोला लोकसभा निवडणूक निकाल 2019:  संजय धोत्रेंचा विजय निश्चित; आंबेडकर दुसऱ्या, तर पटेल तिसऱ्या स्थानावर

Next
ठळक मुद्दे संजय धोत्रे यांना ५ लाख ४८ हजार ९५७ मतं मिळाली आहेत.वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात २ लाख ७२ हजार ७७६ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५२ हजार ५२७ मत मिळाली आहेत.

अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे यांची घोडदौड सुरुच असून, त्यांचा विजय निश्चित झाला आहे. अधिकृत घोषणा झाली नसली, तरी त्यांनी आतापर्यंत ५ लाख ४८ हजार ९५७ मते मिळविली असून, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांच्या जवळपासही नसल्याने संजय धोत्रे हेच पुन्हा अकोल्याचे खासदार असतील.
संजय धोत्रे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर २ लाख ७२ हजार २८१ मतांची मोठी आघाडी घेतली आहे. संजय धोत्रे यांना ५ लाख ४८ हजार ९५७ मतं मिळाली असून , वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात २ लाख ७२ हजार ७७६ मतं पडली आहेत. काँग्रेसचे हिदायत पटेल यांना २ लाख ५२ हजार ५२७ मत मिळाली आहेत. अजुनही मतमोजणी सुरु आहे. संजय धोत्रे यांनी स्वत: चा विक्रम मोडीत काढीत पाच लाखांपेक्षा अधिक मतं मिळविली आहेत. गेल्या निवडणुकीत संजय धोत्रे यांनी ४ लाख ५६ हजार ४७२ मतांसह विजय साकारला होता, तर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांना २ लाख ५३ हजार ३५६ मते मिळाली होती.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. १९८४ पर्यंत काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघात भाजपाने १९८९ मध्ये विजय मिळविल्यावर काँग्रेसला उतरती कळा लागली. १९९८ व १९९९ या दोन निवडणुकीत काँग्रेसने अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडीकेल्यामुळे त्याना यश मिळाले. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसची साथ सोडताच काँर्ग्रेसला व अ‍ॅॅड.आंबेडकरांनाही विजय मिळाला नाही. २०१४ च्या निवडणुकीत रिंगणात असलेलेच उमेदवार २०१९ मध्ये पुन्हा एकदा समोर आल्याने निकालाची पुनरावृत्ती होते की वंचित किंवा काँग्रेस चमत्कार करते याबद्दल उत्सुकता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ६१ हजार ७३९ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ५९.९८ टक्के टक्के मतदान झालंय.

Web Title: Akola Lok Sabha Election 2019 live result & winner: Sanjay Dhotre win confirm in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.