अकोला-खंडवा ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; केंद्रीय वन विभागाकडून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:28 PM2018-06-19T16:28:39+5:302018-06-19T16:30:50+5:30

Akola-Khandwa road broad broad gauge; Central Forest Department approves | अकोला-खंडवा ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; केंद्रीय वन विभागाकडून मंजुरी

अकोला-खंडवा ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; केंद्रीय वन विभागाकडून मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देअकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली.अकोला- खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला .मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती.

अकोला : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉड गेज रूपांतरास वन सवंर्धन कायद्याची परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रूपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत  परिवहन भवन येथे रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या अकोला- खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी वन सवंर्धन कायद्यानुसार परवानगी देण्याचा निर्णय झाला .

 अकोट ते आमला खुर्द ब्रॉडगेजचे काम लवकरच
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रूपांतरास सुरुवात झाली असून, सध्या अकोला-अकोट मार्गाच्या गेज रूपांतरणाचे काम सुरू आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील अकोट ते आमला खुर्द हा भाग अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रूपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते. त्यालासुद्धा गती मिळणार आहे.
 

दीड ते दोन वर्षांत गेज रूपांतरणाचे काम होणार पूर्ण
अकोला ते खंडवा गेज रूपांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजच्या मंजुरीमुळे या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. वर्ष २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात अकोला- खंडवा-रतलाम या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉडगेज अशा गेज रूपांतरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रूपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून, यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.

नऊ राज्य जोडली जाणार!
अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे गेज रूपांतरण झाल्यावर हा रेल्वे मार्ग देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. या मार्गामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक ही राज्यही जोडली जाणार आहेत.

वन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच अकोला- खंडवा हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रूपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्यांतर्गत परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या अकोट ते आमला खुर्द या गेज रूपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लवकरच या मार्गावरील गेज रूपांतरणाच्या कामास सुरुवात होईल.
-संजय धोत्रे, खासदार, अकोला

 

Web Title: Akola-Khandwa road broad broad gauge; Central Forest Department approves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.