Akola: Inauguration of the Bar Association's cricket tournament on Tuesday | अकोला बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

ठळक मुद्देराज्यभरातील क्रिकेट चमू घेणार सहभाग!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, १६ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होत असून, क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. 
१६ जानेवारी रोजी सायंकाळी ७-३0 वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे  माजी अध्यक्ष अँड. बी.के. गांधी, अँड. मोतीसिंह मोहता, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, क्रिकेट आयोजन समितीचे अध्यक्ष अँड. मुन्ना खान, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, सचिव अँड. अनुप देशमुख, अँड. सुमित बजाज, अँड. इलियास शेखानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रात्रंदिवस खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेचा प्रथम सामना स्पर्धेच्या उद्घाटनानंतर अकोला वकील संघ व न्यायाधीश संघ यांच्यात होणार आहे. तसेच अकोला महिला वकील संघ व महिला न्यायाधीश संघ यांच्यात प्रदर्शन सामने होणार आहेत. १६ ते २१  जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ ते रात्री १0 पर्यंत आयोजित या रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, उमरखेड, खामगाव, बाळापूर, पातूर आदी भागातून महिला-पुरुष वकील चमू सहभागी होत आहेत. सहभागी चमूंची निवास व आहार व्यवस्था असोसिएशनच्यावतीने करण्यात येणार आहे. 
या स्पर्धेत नित्य तीन सामने खेळविण्यात येणार असून, उपांत्य फेरी २0 जानेवारी रोजी होऊन अंतिम लढत २१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या अँडव्होकेट चमूने अँड. अजय गोडे, अँड. पवन बाजारे यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यातील समस्त अभियोक्त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीचे अँड. अजय गोडे, अँड. पावन बाजारे, अँड. शंकर ढोले, अँड. संतोष वाघमारे, अँड. राहुल टोबरे, अँड. राहुल वानखडे, अँड. हरीश गोतमारे, अँड. विनय आठवले, अँड. भूषण जोशी, अँड. प्रशांत वाहुरवाघ, अँड. वसीम शेख, अँड. संतोष इंगळे, अँड. उमरीकर, अँड. अमोल क्षीरसागर, अँड. इलियास शेखानी, अँड. अमित डांगेसह बार असोसिएशन व आयोजन समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले.