अकोला : नातवानेच केले आजीचे सात लाखांचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:17 AM2018-01-14T01:17:22+5:302018-01-14T01:18:21+5:30

अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेल्या सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना शनिवारी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नातवाचा हा चेहरा समोर आला. पोलिसांनी इंदिरा कसुरकार यांचा नातू सौरभला अटक करू न श्निवार १३ जानेवारी रोजी  न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Akola: A granddaughter of grandchildren lamps seven lakh jewels | अकोला : नातवानेच केले आजीचे सात लाखांचे दागिने लंपास

अकोला : नातवानेच केले आजीचे सात लाखांचे दागिने लंपास

Next
ठळक मुद्देमराठा नगरातील रामधन प्लॉट मधील घटना पोलीस तपासात नातवानेच दागिने व रोख लंपास केल्याची बाब उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेल्या सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना शनिवारी समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नातवाचा हा चेहरा समोर आला. पोलिसांनी इंदिरा कसुरकार यांचा नातू सौरभला अटक करू न श्निवार १३ जानेवारी रोजी  न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला पाच  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
रामधन प्लॉटमध्ये  इंदिरा बापुराव कसुरकार यांचे संयुक्त कुटुंब रहिवासी आहे. ३0 डिसेंबर रोजी घरातून २४0 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी व ९0 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, घरात चोरट्यांनी तोडफोड न करता तसेच बाहेरील व्यक्ती घरात घुसलाच नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले होते. पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना या चोरी प्रकरणात घरातीलच कुणीतरी सहभागी असल्याचा संशय होता. त्यानुसार शुक्रवारी संध्याकाळी रात्री इंदिरा कसुरकार यांनी रामदास पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले, की घरातून २४ तोळे सोने व एक किलो चांदी, तसेच ९0 हजार रुपये चोरी गेले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी घरातील प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली. दरम्यान, त्यांचा संशय मुलीचा मुलगा सौरभ जगदीश ढोरे याच्यावर गेला. त्यानुसार त्यांनी चौकशी केली असता, त्याने चोरीची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी इंदिरा कसुरकार यांचा नातू सौरभला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपी सौरभ याला १७ जानेवारीपयर्ंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलीस तपासादरम्यान सौरभने चोरीच्या ऐवजाची विल्हेवाट कशी लावली, याबाबतची माहिती दिली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
 
Web Title: Akola: A granddaughter of grandchildren lamps seven lakh jewels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.