अकोला जिल्हा न्यायालय इमारतीचे लवकरच लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:44 PM2019-06-07T15:44:12+5:302019-06-07T15:44:22+5:30

अकोला: गत चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अद्ययावत इमारतीचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे.

Akola district court building soon to be inaugurated | अकोला जिल्हा न्यायालय इमारतीचे लवकरच लोकार्पण

अकोला जिल्हा न्यायालय इमारतीचे लवकरच लोकार्पण

googlenewsNext

अकोला: गत चार-पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अद्ययावत इमारतीचे बांधकाम अखेर पूर्ण झाले आहे. फर्निचरअभावी न्याायालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा रखडला होता; मात्र आता यातील सर्व अडसर दूर झाले असून, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तारीख मिळविण्याचे प्रयत्न होत आहेत.
अकोला जिल्हा न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारण्यासाठी अकोला बार असोसिएशनसोबतच अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान मिळाले. अनेकदा निधी वाढवून घेण्यात आला. दरम्यान, इमारत पूर्ण झाली; मात्र फर्निचरसाठी वेगळा निधी नसल्याने पुन्हा काम थांबले. दरम्यान, पाठपुरावा करून फर्निचरसाठी शासनाने निधी दिला. फर्निचर निर्मितीचे काम कारागृहातील कैद्यांकडे सोपविण्यात आले. दरम्यान, हे कामही आता पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर आता लोकार्पण सोहळ््याची तयारी सुरू झाली आहे. न्यायालयातील अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बैठका वाढल्या असून, त्यात लोकार्पण सोहळ््याची तारीख निश्चित केली जात आहे. लोकार्पण सोहळ््यासाठी विदर्भातून नुकतेच निवडले गेलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांची तारीख मिळविण्याचे प्रयत्न होत आहे. न्यायमूर्ती गवई यांची तारीख मिळताच लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या अकोला बार असोसिएशनचे पदाधिकारी, जिल्हा न्यायालयाचे अधिकारी-कर्मचाºयांना दिलासा मिळणार आहे.

 

Web Title: Akola district court building soon to be inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.