अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:33 PM2019-06-19T12:33:10+5:302019-06-19T12:33:15+5:30

तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले.

In Akola district, 185 sufferers of sickle cell and 3445 are carriers | अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

अकोला जिल्ह्यात सिकलसेलचे १८५ पीडित, तर ३४४५ वाहक

googlenewsNext

अकोला: जनुकीय दोषांमुळे रक्ताच्या पेशींमधील हिमोग्लोबिनचा दोष निर्माण होऊन झालेली समस्या म्हणजेच सिकलसेल हा आजार आहे. अनुवांशिक असल्याने आपल्या सतर्कतेतूनच या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे लग्नापूर्वी प्रत्येकाने सिकलसेलची तपासणी करावी, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिला जातो आहे.
सिकलसेल हा अनुवांशिक असून, केवळ रुग्णाला पाहून किंवा नाडीची चाचणी करून त्याचे निदान करता येत नाही. रुग्णाच्या रक्ताची प्राथमिक सोल्युबिलिटी तपासणी केल्यावरच या आजाराचे निदान करणे शक्य आहे. या आजारात पीडित आणि वाहक असे दोन प्रकारचे रुग्ण आढळून येतात. जिल्ह्यात २०११ पासून ते आतापर्यंत तब्बल ६ लाख ८४ हजार ८८३ नागरिकांची सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आली. यामध्ये १८५ पीडित, तर ३,४४५ वाहक असल्याचे निष्पन्न झाले. वाहक असलेल्या रुग्णामध्ये लक्षण दिसत नाही, त्यामुळे हा समाजामध्ये सिकलसेल आजार वाढविण्याचे काम करतो; परंतु पीडित व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येतात. त्यामुळे सिकलसेल असलेल्या व्यक्तीने सिकलसेल वाहक किंवा पीडित व्यक्तीसोबत विवाह करणे धोक्याचे ठरू शकते. असे झाल्यास हा आजार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे विशेषत: तरुणाईने वेळीच सतर्कता बाळगत सिकलसेलची तपासणी करून घ्यावी. तपासणी अहवालात वाहक किंवा पीडित असाल तर एकमेकांसोबत विवाह टाळा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.

असा विवाह टाळा
सिकलसेल असलेल्या महिला व पुरुषांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळणे हाच त्यावरील नियंत्रणाचा योग्य उपाय आहे. म्हणून सिकलसेल वाहक आणि पीडित किंवा वाहक आणि वाहक, तसेच पीडित आणि पीडित यांनी एकमेकांसोबत विवाह करणे टाळावे.

ही आहेत लक्षणे

  • रक्तवाहिन्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव
  • हातपाय दुखणे
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
  • रुग्णांना दम लागणे
  • कावीळ होणे
  • रक्ताचा दोष निर्माण होणे
  • आॅक्सिजनच्या अभावामुळे तीव्र वेदना


कोणाला होतो हा आजार
एका पिढीपासून दुसºया पिढीला हाणारा हा आजार प्रामुख्याने भिल्ल आदिवासी किंवा वंचित घटकांमध्ये सर्वसाधारणपणे आढळतो. नात्यात विवाह झाल्यास आजाराचा धोका संभवतो. राज्यात सातपुड्याचा पट्टा, गडचिरोली, विदर्भ या भागात आजाराचे प्रमाण जास्त आहे.

सिकलसेल हा आजार अनुवांशिक असल्याने सतर्कता हाच त्यावरील योग्य उपचार आहे. प्रत्येकाने विवाहापूर्वी सिकलसेल तपासणी करूनच विवाह करावा.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, अकोला

 

Web Title: In Akola district, 185 sufferers of sickle cell and 3445 are carriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.