अकोला : पार्किंगच्या जागांवरून विभाग प्रमुखांचा ‘केमिकल लोचा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:26 AM2018-01-20T01:26:51+5:302018-01-20T01:29:01+5:30

अकोला : शहरात महापालिकेच्या जागा पार्किंगसाठी राखीव असताना त्यांची अचूक संख्या किती, त्या कोठे आहेत, याबाबत खुद्द अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले अनभिज्ञ असल्याचे समोर येताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विभाग प्रमुख इंगोले यांना चांगलेच शाब्दीक फटकारे लगावले. यापुढे विभागाची परिपूर्ण माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

Akola: Department Heads confused From Parking Spaces in the city! | अकोला : पार्किंगच्या जागांवरून विभाग प्रमुखांचा ‘केमिकल लोचा’!

अकोला : पार्किंगच्या जागांवरून विभाग प्रमुखांचा ‘केमिकल लोचा’!

Next
ठळक मुद्देजागांची माहितीच नाहीआयुक्तांनी सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरात महापालिकेच्या जागा पार्किंगसाठी राखीव असताना त्यांची अचूक संख्या किती, त्या कोठे आहेत, याबाबत खुद्द अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले अनभिज्ञ असल्याचे समोर येताच महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विभाग प्रमुख इंगोले यांना चांगलेच शाब्दीक फटकारे लगावले. यापुढे विभागाची परिपूर्ण माहिती घेऊनच बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.
शहराच्या मोक्याच्या ठिकाणी महापालिकेच्या मालकीच्या जागा आहेत. सदर जागा पार्किंगसाठी भाडेपट्टय़ावर दिल्या असून, त्यापासून मनपाला मोठा महसूल प्राप्त होतो. या जागांची देखभाल व त्यासंदर्भात निविदा प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाकडे आहे. सद्यस्थितीत शहरात २२ जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आल्याची नोंद मनपाच्या अतिक्रमण विभागात आहे. संबंधित विभागाने गतवर्षी २२ पैकी १२ जागा भाडेपट्टय़ावर दिल्याची माहिती आहे. यापासून मनपाला उत्पन्नापोटी १३ ते १४ लाख रुपये प्राप्त होतात. शहरात विविध कामानिमित्त येणार्‍या चारचाकी, दुचाकी, तीन चाकी वाहनधारकांसाठी पार्किं गच्या जागा उपलब्ध असणे क्रमप्राप्त असताना सदर जागांवर लघू व्यावसायिक, फेरीवाले, हातगाडी चालकांनी ठिय्या मांडल्याचे चित्र आहे. खासगी कंत्राटदारांच्या संमतीने अतिक्रमकांनी व्यवसाय उभारले असून, त्याबदल्यात कंत्राटदारांचे खिसे भरले जात आहेत. यादरम्यान, संबंधित कंत्राटदारांचा क रारनामा डिसेंबर महिन्यात संपुष्टात आल्यानंतरही त्यांच्याकडून जुन्या दरानुसार पैसे वसूल केले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाने पार्किं गसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. साहजिकच, अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून चालविल्या जाणार्‍या कामकाजाची विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांना इत्थंभूत माहिती असणे अपेक्षित आहे. याठिकाणी नेमका उलटा प्रकार समोर आला. आढावा बैठकीत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पार्किं गच्या संदर्भात आत्माराम इंगोले यांना माहिती विचारली असता ते अनभिज्ञ असल्याचे समोर आले. 

जागेचा सर्व्हे करण्याची गरज
आजरोजी शहरात पार्किंगसाठी नेमक्या जागा किती, यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे माहिती उपलब्ध नाही. ज्या जागा पार्किंगसाठी भाडेपट्टय़ावर दिल्या आहेत, त्यातही जाणीवपूर्वक घोळ करून ठेवला आहे.
कागदोपत्री पार्किंगच्या जागा दिसत असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचा वापरच होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. हा सर्व प्रकार पाहता मनपा प्रशासनाने पार्किंंगच्या जागांसाठी शहरात सर्व्हे करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पदाधिकारी अंधारात
शहरातील पार्किंगच्या जागांवर अतिक्रमकांनी ठिय्या मांडला असतानाही अतिक्रमण विभाग कारवाई करत नाही. अर्थातच, या विभागातील कर्मचारी किती प्रामाणिक आहेत, याचा प्रत्यय येतो. काही जागा परस्पर हॉकर्स झोनसाठी राखीव ठेवण्यापर्यंंत अतिक्रमण विभागाने मजल गाठली आहे. शहराची धोरणात्मक बाब लक्षात घेता पदाधिकार्‍यांना विश्‍वासात घेणे अपेक्षित असताना त्यांना अंधारात ठेवले जात असल्याचे चित्र आहे. यामुळे अतिक्रमण विभागाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

Web Title: Akola: Department Heads confused From Parking Spaces in the city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.