अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले विदर्भ क्रिकेट संघात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:41 AM2017-11-25T00:41:07+5:302017-11-25T00:46:10+5:30

अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले याची  बीसीसीआय अंतर्गत  १ डिसेंबरपासून रायपुर येथे होणार्‍या सामन्यांकरिता १६  वर्षाखालील विदर्भ क्रिके ट संघात निवड झाली आहे.

Akola Cricket Club spinner Ganesh Bhosale in Vidarbha Cricket team! | अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले विदर्भ क्रिकेट संघात!

अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले विदर्भ क्रिकेट संघात!

googlenewsNext
ठळक मुद्देबीसीसीआय अंतर्गत १ डिसेंबरपासून रायपुर येथे होणार सामने१६ वर्षाखालील विदर्भ क्रिके ट संघात गणेशची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला क्रिकेट क्लबचा फिरकीपटू गणेश भोसले याची  बीसीसीआय अंतर्गत  १ डिसेंबरपासून रायपुर येथे होणार्‍या सामन्यांकरिता १६  वर्षाखालील विदर्भ क्रिकेट संघात निवड झाली आहे. अत्यंत बिकट परिस्थिती त गणेशने विदर्भ क्रिकेट संघात स्थान मिळविले आहे.
गणेशने या सिझनमध्ये झालेल्या सर्व निवड चाचणी व सराव सामन्यात  गोलंदाजीत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्याची विदर्भ संघात निवड  झाली. गणेशने अत्यंत बिकट परिस्थितीतून व घरात कुठलीही खेळाची  पार्श्‍वभूमी नसतानासुद्धा जिद्द, मेहनत व आत्मविश्‍वास या गुणांमुळे क्रिकेट  क्षेत्रात पदार्पण करू न यशस्वी झाला, अशी माहिती अकोला क्रिकेट क्लबचे  कर्णधार तथा व्हीसीएचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली. 

Web Title: Akola Cricket Club spinner Ganesh Bhosale in Vidarbha Cricket team!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.