Akola: A biker hit the back of the New Year's return; One killed, one serious | अकोला : नववर्षाचा जल्लोष करून परतताना दुचाकी खांबावर आदळली; एक ठार, एक गंभीर
अकोला : नववर्षाचा जल्लोष करून परतताना दुचाकी खांबावर आदळली; एक ठार, एक गंभीर

ठळक मुद्देगोरेगाव येथील घटना नववर्षाचा जल्लोष करून परतताना अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्‍या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री गोरेगाव खुर्दनजीक घडली.  शिरीष विश्‍वासराव तायडे रा. गोरेगाव असे मृतक तरुणाचे नाव आहे.
अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द येथील काही तरुणांनी  ३१ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त गावानजीकच्या शेतात पार्टी आयोजित केली होती. गावातीलच आदित्य तिडके यांच्या शेतात न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी रंगली. या पार्टीत शिरीष तायडे हा रत्नदीप तायडे व रोहन तायडे या आपल्या सैन्यातील मित्रांसोबत सहभागी होण्यासाठी मोटारसायकलवरून गेला. मध्यरात्रीपर्यंत पार्टी केल्यानंतर घराकडे परत येत असताना रत्नदीप मोटारसायकल चालवित होता. मन्साराम तिखिले यांच्या शेताजवळच्या वळणावर रत्नदीपचे नियंत्रण सुटले व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जाऊन धडकली. ही धडक एवढी जोरदार होती की, यामध्ये शिरीष तायडे हा जागीच मृत्युमुखी पडला. 
या अपघातात रत्नदीप तायडे हा देखील जखमी झाला. यावेळी त्यांच्यासोबतच घरी परत येत असलेल्या मुकेश तायडे, सचिन तायडे, गोलू मुंडे यांनी शिरीष तायडे याला अकोला येथे रुग्णालयात आणले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिरीष हा विश्‍वासराव तायडे यांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. 


Web Title: Akola: A biker hit the back of the New Year's return; One killed, one serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

संबंधित बातम्या

गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

गँगमनच्या सतर्कतेमुळे टळला रेल्वेचा अपघात

9 hours ago

मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

9 hours ago

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पित्याचा अपघातात मृत्यू

9 hours ago

बीड जिल्ह्यात तीन अपघात; पाच ठार

बीड जिल्ह्यात तीन अपघात; पाच ठार

10 hours ago

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी 

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट जखमी 

11 hours ago

तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच

तारवालानगर चौफुलीवर अपघातांची मालिका सुरूच

12 hours ago

प्रमोटेड बातम्या

अकोला अधिक बातम्या

भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली

भरधाव लक्झरी बसची दुचाकीला धडक; मायलेकांसह तीन जागीच ठार, जमावाने बस पेटविली

1 day ago

जिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप 

जिल्हा परिषदेला निधी देण्यात राजकारण; जि.प.सदस्य कोल्हे यांचा आरोप 

1 day ago

पाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण

पाणी पुरवठा योजनांवर देयकाची उधळण

1 day ago

निधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले!

निधी, अंदाजपत्रके नसल्याने काम वाटप बारगळले!

1 day ago

उगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजनेला प्रशासकीय मान्यता!

उगवा येथील पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजनेला प्रशासकीय मान्यता!

1 day ago

पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी!

पाणीटंचाईचा खर्च भागविण्यासाठी जिल्हा परिषदेला ३.५० कोटी!

1 day ago