अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:35 AM2017-12-30T01:35:16+5:302017-12-30T01:35:58+5:30

अकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्‍या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. 

Akola: 4.75 lakh cash seized from 'ATP' center looting accused | अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त

अकोला : ‘एटीपी’ केंद्र लुटणार्‍या आरोपींकडून ४.७५ लाखांची रोकड जप्त

Next
ठळक मुद्देदुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रदरोडा घालून लुटली होती ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना रविवारपर्यंत पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रात दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटून नेणार्‍या तिघा आरोपींना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी आरोपींकडून लुटीतील ४ लाख ७५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. 
दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्रामध्ये दरोडा घालून इलेक्ट्रिशियन संतोष राजाराम भटकर (३२), वसंत नारायण महाराज आणि काले खान महेमुद खान यांनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर आरोपींनी एटीपी मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड लुटून नेली. २२ डिसेंबर रोजी पहाटे पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. 
तिघेही आरोपी शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

Web Title: Akola: 4.75 lakh cash seized from 'ATP' center looting accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.