Akola: 1.75 lakh ornaments worth looted by misbehaving elderly! | अकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ९ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता गांधी चौकाजवळ घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 
रतनलाल चौक येथे राहणार्‍या कौशल्याबाई जयकिशन बजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी त्या दानाबाजारातील श्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर कौशल्याबाई गांधी चौकातील देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आल्या. याठिकाणी देवीचे दर्शन घेतल्यावर त्या नेहमीप्रमाणे तुलशान फर्निचरजवळ गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी गेल्या. या ठिकाणी एक अनोळखी युवक आला. त्याने कौशल्याबाईला तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. इकडे या असे म्हटले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून कौशल्याबाई जवळच उभ्या असलेल्या दोन अनोळखी युवकांकडे गेल्या. त्यानंतर तिघाही युवकांनी कौशल्याबाईंना धाकदपट करून त्यांच्या हातातील ४0 ग्रॅमच्या चार बांगड्या आणि गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तेथून पसार झाले. 


Web Title: Akola: 1.75 lakh ornaments worth looted by misbehaving elderly!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.