अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 02:30 AM2017-12-26T02:30:51+5:302017-12-26T02:31:42+5:30

अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.

Akola: 11 die deaths in four days in the crash | अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

अकोला : अपघातात चार दिवसांत ११ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देरस्त्यांनी घेतला बळीप्रशासनाला जाग येईना

सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग, अकोला ते अकोट रोडवरील चोहोट्टा बाजार  तसेच पातूर घाटात झालेल्या वेगवेगळय़ा अपघातात गत चार दिवसांमध्ये ११ जणांचा बळी गेल्याचे  धक्कादायक वास्तव आहे. गत चार दिवसांमध्ये अचानकच अपघातांची मालिका वाढली असून,  यामध्ये ११ च्यावर वाहनचालक व प्रवासी ठार झाले आहेत.
अकोला ते अमरावती राष्ट्रीय महामार्गावर गत दोन दिवसांत झालेल्या अपघातात सात जण ठार  झाले आहेत, तर पातूर घाटात रविवारी रात्री झालेल्या अपघातात एक जण ठार झाला आहे.  यासोबतच विटांच्या मिनी ट्रकखाली येऊन एक जण जागेवरच ठार झाल्याची घटना चोहोट्टा बाजार  परिसरात शनिवारी घडली. सोमवारी दुपारी शिवणी विमानतळाजवळ झालेल्या अपघातात तीन जण  ठार झाले असून, बडनेराजवळील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघातात नागपुरा तील चार जण जागेवरच ठार झाले आहेत. बोरगाव मंजूजवळ आल्टो कार व टँकरच्या अपघातात  नागपूर जिल्हय़ातील कन्हान येथील दोघे जण जागेवरच ठार झाले होते. अशा प्रकारे गत चार  दिवसांमध्ये चाहोट्टा बाजार, पातूर घाट, बोरगाव मंजू, लोणी व शिवणी विमानतळाजवळ झालेल्या  अपघातात ११ जण ठार झाले असून, पाचच्यावर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी  रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या चाळणीमुळे अपघात वाढले!
रस्त्यावर पडलेल्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे अपघाताचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची माहिती  समोर आली आहे. अकोला-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांत झालेले अपघात हे  केवळ रस्त्यावरील खड्डय़ांमुळे झाल्याचे वास्तव आहे. तसेच चोहोट्टा बाजार येथील अपघातही रस् त्यावरील खड्डे वाचविताना झाल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. यासोबतच पातूर घाटातील अपघा तालाही रस्त्यावरील खड्डेच जबाबदार असल्याने सार्वजनिक बांधकाम खाते व राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळेच या ११ जणांचा बळी गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला आहे.

सार्वजनिक बांधकाम वभागाचे दावे फोल
सार्वजनिक बांधकाम विभागाने १५ डिसेंबरपूर्वी राज्यातील पूर्ण रस्त्यांवरील खड्डे बुजविणार  असल्याच्या घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आल्या होत्या; मात्र अकोला जिल्हय़ातील  परिस्थिती विदारक असून, एकाही रस्त्यावरील खड्डा बुजविण्यात आला नसून, उलट १५  डिसेंबरनंतर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या ११ जणांच्या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभाग  व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार असून, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याची मागणी होत  आहे.
 

Web Title: Akola: 11 die deaths in four days in the crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.