ठळक मुद्देपाण्याचा एकही कायमस्वरू पी स्रोत नाहीसंशोधन हलवावे लागणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना आतापासूनच धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक संशोधनाचे प्लॉट येथून हलवावे लागणार आहेत.
   कृषी विद्यापीठाकडे जवळपास पाच हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणी रंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्र आहेत. रब्बी पिकांची तयारी सध्या सुरू  करण्यात आली; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि, यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने हिवाळय़ातच रब्बी पिकांच्या पेरणीचा प्रश्न उपस्थित झाला. आताच ही परिस्थिती आहे, तर उन्हाळ्यात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. 
अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. या कृषी विद्यापीठाने अनेक वाण विकसित करू न शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण अलीकडच्या पाच-सात वर्षांत पावसाची अनिश्‍चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम होत आहेत. रब्बी हंगामातील पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते; परंतु पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. यावर्षीची परिस्थिती तर खूपच वेगळी आहे. पाणीच नसल्याने रब्बीचे उत्पादन घेणार कसे, यासाठीची कसरत सध्या विद्यापीठात सुरू  आहे. 

कृषी विद्यापीठात कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत नाही, हे खरे आहे. शरद सरोवरही विमानतळ विस्तारीकरणात गेला आहे. त्यामुळे सध्या जेथे ओलावा आहे, तेथे रब्बीचे बीजोत्पादन घेतले जाईल. कूपनलिकांना जेथे पाणी उपलब्ध आहे, त्याचा वापर करण्यात येईल. उन्हाळ्यात मात्र परिस्थिती गंभीर होईल. त्यासाठी विदर्भात जेथे पाणी उपलब्ध आहे, तेथे येथील संशोधन हलविले जाणार आहे. लवकरच कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत मिळण्यासाठी प्रयत्न शासनाकडे करणार आहे.
डॉ. व्ही. एम. भाले,
कुलगुरू ,डॉ. पं.दे.कृ. वि., अकोला.
-