मशीनच्या उपलब्धतेनंतर 'सुजलाम, सुफलाम'ला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 05:28 PM2019-03-10T17:28:25+5:302019-03-10T17:28:45+5:30

वाशिम: राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येणाºया सुजलाम, सुफलाम अभियानासाठी जेसीबी आणि पोकलन मशीन उपलब्ध करण्यात येत आहेत.

After the machine's availability, the speed at Sujalam, Suffalam | मशीनच्या उपलब्धतेनंतर 'सुजलाम, सुफलाम'ला वेग

मशीनच्या उपलब्धतेनंतर 'सुजलाम, सुफलाम'ला वेग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य शासन आणि बीजेएसच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येणाºया सुजलाम, सुफलाम अभियानासाठी जेसीबी आणि पोकलन मशीन उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी थंड पडलेल्या या अभियानातील कामांना आता वेग आला असून, प्रामुख्याने मानोरा, कारंजा आणि वाशिम तालुक्यात वेगात कामे होत आहेत.
सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत कठीण खोदकामांसाठी पोकलन मशीनची आवश्यकता असल्याने वाशिम जिल्ह्यात या अभियानातील कामे रेंगाळली होती. या कामांची प्रशासकीय जबाबदारी सांभाळणारा कृषी विभाग, जि.प. लघू सिंचन विभाग, पाटबंधारे विभाग आणि वनविभागाला त्यामुळे अडचणी येत होत्या. या पृष्ठभूमीवर संबंधित अधिकाºयांनी बीजेएसच्या जिल्हा समन्वयकांसह जिल्हा प्रशासनाकडे पत्र सादर करून मशीन उपलब्ध करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर पोकलन आणि आवश्यक तेथे जेसीबी मशीन उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. काही मशीन उपलब्धही झाल्या. त्यामुळे या कामांना आता वेग आला आहे. या अंतर्गत कारंजा तालुक्यातील मोखड, खानापूर, महागाव, मानोरा तालुक्यातील पिंप्री हनुमानसह वाशिम तालुक्यातील काही गावांत  नाला खोलीकरणाची कामे वेगात सुरू झाली आहेत.

Web Title: After the machine's availability, the speed at Sujalam, Suffalam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.