Advocate Cup cricket championship Yavatmal team! | अकोल्यात पार पडलेल्या अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यवतमाळ संघाला!
अकोल्यात पार पडलेल्या अँडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यवतमाळ संघाला!

ठळक मुद्देअकोला ‘ए’ वकील संघ उपविजेताअकोला बार असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 
विजयी यवतमाळ संघाला अँड.मोहनराव देशमुख यांच्या स्मृतीत दिल्या जाणारे प्रथम पारितोषिक  ४१ हजार रुपये रोख व चषक अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.सत्यनारायण जोशी,अँड .मोतीसिंह मोहता, अँड.बी.के.गांधी,अँड सुभाष काटे, अँड.शाम खोटरे,प्रकल्प प्रमुख अँड.मुन्ना खान, अड.इलियास शेखानी यांच्या उपस्थित बहाल करण्यात आले. यावेळी खेळाडू वकीलवर्गाने  जल्लोष करून यवतमाळ वकील संघाचे स्वागत केले. उपविजेता अकोला ‘ए’ संघाला अँड.शंकर ढोले यांच्या वतीने दिल्या जाणारा द्वितीय पुरस्कार २१ हजार व ट्रॉफी बहाल करण्यात आला. परभणी वकील संघाला  १५ हजार रुपयांचा तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सामन्यात अकोला वकील संघाचे अँड.जयस्वाल सामनावीर ठरले तर अँड.पियुष देशमुख  मॅन ऑफ द सिरीज ठरले.उत्कृष्ट फलंदाजांचा पुरस्कार यवतमाळच्या अँड.दिनेश पवार यांना तर उत्कृष्ठ गोलंदाज म्हणून यवतमाळचे अँड.सचिन यांना पुरस्कार देण्यात आला. समारोपीय सोहळ्यात महिला वकील चमूचा सहभागाबद्दल गौरव करण्यात आला.अम्पायरिंग सनत डोंगरे यांनी परीक्षण व समालोचन अन्सार कुरेशी यांनी तर स्कोरिंग अँड.राहुल वानखडे,अँड.नावेद अली, अँड.अमोल देशमुख यांनी केले. समारोपीय सोहळ्याचे संचालन अँड.शंकर ढोले यांनी तर आभार अँड.इलियास शेखानी यांनी मानले. 
यावेळी अँड.अनुप देशमुख,अँड.सुमित बजाज, अँड.गजानन खाडे,अँड.पवन बाजारे,अँड.प्रवीण तायडे,अड. अँजय गोडे,अँड.भूषण जोशी, अँड.आशिष देशमुख, अँड.संतोष वाघमारे,अँड.राहुल टोबरे,अँड.राहुल वानखडे,अँड.हरीश गोतमारे,अँड.विनय आठवले,अँड.प्रशांत वाहुरवाघ,अँड.वसीम शेख, अँड.संतोष इंगळे ,अँड.उमरीकर,अँड.अमित डांगे उपस्थित होते.


Web Title: Advocate Cup cricket championship Yavatmal team!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.