मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी केल्यास ‘बीएलओं’विरुद्ध कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:45 PM2018-09-14T12:45:08+5:302018-09-14T12:47:20+5:30

अकोला : मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी व दुर्लक्ष करणाºया मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी बुधवारी दिला.

Action against BLO'S, if you have neglected the voter lists! | मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी केल्यास ‘बीएलओं’विरुद्ध कारवाई!

मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी केल्यास ‘बीएलओं’विरुद्ध कारवाई!

Next
ठळक मुद्देमतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) करण्यात येत आहे.कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी दिला.

अकोला : मतदार याद्यांच्या कामात हलगर्जी व दुर्लक्ष करणाºया मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी बुधवारी दिला.
निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदार नोंदणी मोहिमेत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीची मतदार यादीत नावे समाविष्ट करणे, मतदार यादीतून नाव वगळणे किंवा कमी करणे तसेच मतदारांच्या नावात, पत्त्यात किंवा इतर तपशिलामध्ये बदल करण्यासाठी मतदारांकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्याचे काम मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांमार्फत (बीएलओ) करण्यात येत आहे; परंतु आदेश प्राप्त होऊनही अकोला तालुक्यात ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी मतदार याद्यांचे काम अद्याप सुरू केले नाही, तसेच मतदार याद्यांच्या कामात जाणीवपूर्वक हलगर्जी व दुर्लक्ष करणाºया मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांविरुद्ध (बीएलओ) लोप्रितिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचा इशारा अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) डॉ. नीलेश अपार यांनी दिला.

तहसील कार्यालयात घेतला आढावा!
मतदान नोंदणी विशेष मोहिमेंतर्गत अकोला तालुक्यातील कामाचा आढावा बुधवारी उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांनी तहसील कार्यालयातील सभागृहात घेतला. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम यांच्यासह निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Action against BLO'S, if you have neglected the voter lists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.