पातूर-बाळापूर मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:27 PM2018-03-27T16:27:14+5:302018-03-27T16:27:14+5:30

पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे.

accident on patur-balapur road; one killed |  पातूर-बाळापूर मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, एक ठार

 पातूर-बाळापूर मार्गावर कंटेनरची दुचाकीस धडक, एक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देमळसूर येथील रमेश देवकते हे दुचाकी क्र.एमएच ३० के २१४२ ने पातूरकडे जात होते. देउळगाव फाट्याजवळ पातुरकडून बाळापुरकडे जाणाऱ्या एचआर ५५ पी ५६८७ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले आहेत.


पातूर : भरधाव कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. ही घटना पातूर शहरापासून जवळच असलेल्या देउळगाव फाट्याजवळ २७ मार्च रोजी दुपारी १ वाजता घडली. रमेश सोनाजी देवकते (५५)रा.मळसूर असे मृतकाचे नाव आहे.
मळसूर येथील रमेश देवकते हे दुचाकी क्र.एमएच ३० के २१४२ ने पातूरकडे जात होते. दरम्यान, देउळगाव फाट्याजवळ पातुरकडून बाळापुरकडे जाणाऱ्या एचआर ५५ पी ५६८७ क्रमांकाच्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले आहेत. जि. प. कृषी योजनेतून त्यांची पाच हॉर्सपॉवरची मोटारपंप मंजुर झाले होते. या पंपाची रक्कम भरण्यासाठी ते पातुरच्या बँकेत डीडी काढण्यासाठी येत असताना दुदैवाने त्यांचा अपघात झाला. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा आहे. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणी वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: accident on patur-balapur road; one killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.