नव्या शैक्षणिक सत्रात ५४0 शाळांना १00 टक्के निकालाचे टार्गेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:16 PM2018-05-16T14:16:51+5:302018-05-16T14:22:38+5:30

येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ५४0 शाळांना इयत्ता नववी व दहावीचे निकाल १00 टक्के लावण्याचे टार्गेट दिले आहेत.

540 schools to achieve 100 percent results in new academic session! | नव्या शैक्षणिक सत्रात ५४0 शाळांना १00 टक्के निकालाचे टार्गेट!

नव्या शैक्षणिक सत्रात ५४0 शाळांना १00 टक्के निकालाचे टार्गेट!

Next
ठळक मुद्देगतवर्षीच माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांचा १00 टक्के निकाल लावण्यासाठी निर्णय घेतला होता.गत शैक्षणिक सत्रात केवळ ४५ शाळांचाच निकाल १00 टक्के लागला होता, हे विशेष. प्रत्येक विद्यार्थ्याला ४00 पैकी किमान ३00 गुण मिळाले पाहिजे, यासाठी १७0 शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- नितीन गव्हाळे

अकोला: गतवर्षीच माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांचा १00 टक्के निकाल लावण्यासाठी निर्णय घेतला होता. त्यासाठी शिक्षकांवर १00 टक्के निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यास बजावले होते. येत्या नव्या शैक्षणिक सत्रात शिक्षण विभागाने अकोला जिल्ह्यातील ५४0 शाळांना इयत्ता नववी व दहावीचे निकाल १00 टक्के लावण्याचे टार्गेट दिले आहेत. गत शैक्षणिक सत्रात केवळ ४५ शाळांचाच निकाल १00 टक्के लागला होता, हे विशेष.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद, अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील गुणवत्तेच्या दर्जामध्ये सुधारणा व्हावी. विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांना १00 टक्के निकाल लावण्याचे उद्दिष्ट दिले. त्यानुसार गतवर्षी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ४४८ शाळांना १00 टक्के निकाल लावण्याचे उद्दिष्ट दिले होते; परंतु हे उद्दिष्ट साध्य करण्यात जिल्ह्यातील केवळ ४५ शाळांना यश मिळाले. २१५ शाळांचा निकाल ८१ ते ९0 टक्केपर्यंत लागला तर १८८ शाळांचा निकाल ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत लागल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश दुतंडे यांनी दिली. २0१६ व १७ या वर्षात शाळांची इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्र्थ्यांची शैक्षणिक कामगिरी ९८.८७ टक्के असल्याचे अहवालामध्ये शाळांनी कळविले आहे. २६ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात होणार आहे. या नवीन शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील ५४0 माध्यमिक शाळांना इयत्ता नववी व दहावीचा निकाल १00 टक्के लावण्याचे टार्गेट दिले आहेत; तसेच नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ४00 पैकी किमान ३00 गुण मिळाले पाहिजे, यासाठी १७0 शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत.

गत शैक्षणिक वर्षातील शाळांची गुणवत्ता
८१ ते ९0 टक्के निकाल लागलेल्या शाळा- २१५
९१ ते ९९ टक्के निकाल लागलेल्या शाळा- १८८
१00 टक्के निकाल लागलेल्या शाळा- ४५

यंदा १00 टक्के निकालाचे टार्गेट दिलेल्या शाळा
नववी- ३९0
दहावी- १५0

 

 

Web Title: 540 schools to achieve 100 percent results in new academic session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.