Maharashtra Election Voting Live : अकोल्यात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 04:52 PM2019-04-18T16:52:13+5:302019-04-18T16:52:50+5:30

दुपारी ३ वाजतापर्यंत ४५.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली.

 45 percent polling till noon in Akola | Maharashtra Election Voting Live : अकोल्यात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान

Maharashtra Election Voting Live : अकोल्यात दुपारपर्यंत ४५ टक्के मतदान

Next

अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदार संघात गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. दुपारी ३ वाजतापर्यंत ४५.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली.एकून १८ लाख ६१ हजार ७५९ मतदारांपैकी ८ लाख ४५ हजार ९४ मतदारांनी मतदान केले. दरम्यान, मतदान यंत्रामध्ये निर्माण झालेल्या किरकोळ तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी बॅलेट युनीट तर काही ठिकाणी कंट्रोल युनीट बदलावे लागले.
अकोला मतदार संघातील २०८५ मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोल झाल्यानंतर शांततेत मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. सकाळी सात ते नऊ या कालावधीत ७. ५६ टक्के अर्थात आठ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, सकाळी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ३४.४२ टक्क्यांवर पोहोचली होती.
अकोला लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत असून, अकोला लोकसभा मतदार संघात अकोट, बाळापूर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मुर्तीजापूर व वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभांचा समावेश आहे.
गुरुवारी सकाळपासूनच मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान यंत्र सुरु न होण्याच्या किरकोळ घटनांचा अपवाद वगळता मतदानाला सुरुवात झाली. अकोला लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.५६ टक्के मतदान झाले होते. मतदानासाठी जिल्ह्यात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, आतापर्यंत कोणत्याही अप्रिय घटनेचे वृत्त नाही. संवेदनशिल व दुपारनंतर मतदानाले वेग पकडल्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.३९ टक्के मतदानाची नोंद झाली.

Web Title:  45 percent polling till noon in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.