मानव मिशन अंतर्गत मालेगावात ४४३ विद्यार्थीनींना मिळणार सायकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 05:56 PM2018-12-16T17:56:02+5:302018-12-16T17:56:42+5:30

मालेगाव तालुक्यात १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींना १५ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या सायकलींचे वितरण होणार आहे.

443 students will get bicycles in Malegaon | मानव मिशन अंतर्गत मालेगावात ४४३ विद्यार्थीनींना मिळणार सायकली

मानव मिशन अंतर्गत मालेगावात ४४३ विद्यार्थीनींना मिळणार सायकली

Next

- अमोल कल्याणकर  
मालेगाव (वाशिम) : ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना प्रवास येणाºया अडचणी लक्षात घेता मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात येते. या अभियानांतर्गत २०१८-१९ या वर्षासाठी मालेगाव तालुक्यात १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींना १५ लाख ५० हजार ५०० रुपयांच्या सायकलींचे वितरण होणार आहे. मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे या संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 
ग्रामीण भागांतून शहरे किंवा नजिकच्या खेड्यांत शिक्षणासाठी येजा करणाºया विद्यार्थीनींसाठी मोफत बससेवा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू आहे. तथापि, काही ठिकाणी या बसफेºया जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित भागातील विद्यार्थीनींना शैक्षणिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा ५ ते ६ किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो, तसेच त्यांची सुरक्षाही धोक्यात येते. ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शालेय प्रवासासाठी विद्यार्थीनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते. यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी पंचायत समितीस्तरावरून प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. त्यानुसार पंचायत समितीच्यावतीने मालेगाव तालुक्यातील शाळा आणि विद्यार्थीनींची पडताळणी करून १५ शाळांतील ४४३ विद्यार्थीनींसाठी १५ लाख ५० हजार ५०० रुपये खर्चाचा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकाºयांकडे पाठविला आहे.

Web Title: 443 students will get bicycles in Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.