गरिबांसाठी २३६० क्विंटल डाळ; शिधापत्रिकाधारकांना होणार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 02:31 PM2019-03-17T14:31:43+5:302019-03-17T14:31:49+5:30

अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील गरिब शिधापत्रिकाधारकांसाठी मार्च महिन्यात तूर व हरभरा डाळ वितरीत करण्यासाठी २ हजार ३६० क्विंटल डाळीचा साठा शुक्रवारी उपलब्ध झाला आहे.

2360 quintals of pulses for the poor; Distribution will be done to ration card holders | गरिबांसाठी २३६० क्विंटल डाळ; शिधापत्रिकाधारकांना होणार वितरण

गरिबांसाठी २३६० क्विंटल डाळ; शिधापत्रिकाधारकांना होणार वितरण

Next


अकोला : सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील गरिब शिधापत्रिकाधारकांसाठी मार्च महिन्यात तूर व हरभरा डाळ वितरीत करण्यासाठी २ हजार ३६० क्विंटल डाळीचा साठा शुक्रवारी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध डाळीचे वितरण रास्तभाव दुकानांमधून लवकरच शिधापत्रिकाधारकांना सुरु करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गंत प्राधान्य गटातील आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना तूर व हरभरा डाळीचे वितरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या मागणीनुसार १ हजार ४६० क्विंटल तूर डाळ आणि ९०० क्विंटल हरभरा डाळा असा एकूण २ हजार ३६० क्विंटल डाळीचा साठा १५ मार्च रोजी जिल्हयातील शासकीय धान्य गोदामांत प्राप्त झाला. उपलब्ध डाळीचे वितरण लवकरच जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांमार्फत शिधापत्रिकाधारकांना सुरु करण्यात येणार आहे.

Web Title: 2360 quintals of pulses for the poor; Distribution will be done to ration card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला