अकोल्यातील १७० विद्यार्थ्यांची होणार हृदयशस्त्रक्रिया पूर्व तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:02 PM2017-10-27T17:02:06+5:302017-10-27T17:10:50+5:30

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीवेळी आढळलेल्या संशयीत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर) चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

170 students will be examined in cardiac surgery in Akola | अकोल्यातील १७० विद्यार्थ्यांची होणार हृदयशस्त्रक्रिया पूर्व तपासणी

अकोल्यातील १७० विद्यार्थ्यांची होणार हृदयशस्त्रक्रिया पूर्व तपासणी

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी शिबिर

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीवेळी आढळलेल्या संशयीत हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदयशस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर) चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असलेल्या या तपासणी शिबिराला मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण व डॉ. पंकज शहा हे आपली सेवा देणार आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कायक्रम अंतर्गत ० ते १० वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, तपासणीवेळी किरकोळ आजाराने दोषी विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी पथकामार्फत शाळा/अंगणवाडीतच औषधोपचार दिला जातो. तर गंभीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांना आजाराचे तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तात्काळ निदान व औषधोपचारासाठी ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय सतरावर संदर्भित केले जाते. सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी आकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर व पातूर या तालुक्यांमधील तसेच मंगळवार, ३१ आॅक्टोबर रोजी अकोला ग्रामीण, अकोला महानगरपालिका व नगरपरिषद क्षेत्रातील एकून १७० संशयीत हृदयरुग्ण बालकांची २ डी ईको तपासणी करण्यात येणार आहे.

 

Web Title: 170 students will be examined in cardiac surgery in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.