बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 04:04 PM2019-05-19T16:04:51+5:302019-05-19T16:05:14+5:30

तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे.

17 thousand 442 farmers of Balapur taluka have been deprived of drought assistance | बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

बाळापूर तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित

googlenewsNext


- अनंत वानखडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर: अल्प पाऊस, खरिपाच्या उत्पादनात मोठी घट, आणेवारी कमी आल्याने शासनाने अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला आहे, तसेच दुष्काळी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी मदत थेट खात्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बाळापूर तालुक्यातील अर्धे शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.
अल्प पाऊस, खरीप पिकांच्या उत्पादनात घट आल्याने शासनाने बाळापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. दुष्काळी उपाययोजनांसह प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात येत आहे. तालुक्यातील सात मंडळांतर्गत ४१ हजार ५३३ शेतकरी खातेदार आहेत. यापैकी २४ हजार ०९२ शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा झाले आहे. तालुक्यातील १७ हजार ४४२ शेतकºयांना अजूनही अनुदाची प्रतीक्षा आहे. एकापेक्षा जास्त खातेदार म्हणून सात-बारावर नावे आहेत, अशा इतर खातेदारांच्या खात्यात बँकांनी निधी न देण्याचे पत्र तहसीलदारांना दिले आहे. याबाबत अनेक खातेदारांमध्ये वारसाबाबत वाद आहेत. काही बाहेरगावी असल्याने त्यांचे खाते क्रमांक नसल्याने कोट्यवधींचा शासन निधी कॅनरा बँकेत पडून आहे. खातेदार दररोज तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, बँकांमध्ये चकरा मारत आहेत. तलाठ्यांनी शेतकºयांचे अपडेट खाते क्रमांकाची यादी तहसील कार्यालयाला दिली. याच यादीवर बँकनिहाय शेतकरी खातेदारांची खाते क्रमांकाची यादीसह निधी रक्कम खातेदाराच्या खात्यात जमा करण्यासाठी कॅनरा बँकेचे धनादेश संबंधित बँकांना दिले.
संबंधित बँकांनी खातेदारांच्या क्रमांक व इतर वारसाबाबतचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र मागणी न करता अनेक धनादेश तहसील कार्यालयाला परत केले. बँका खातेदारांना योग्य माहिती देत नसल्याने खातेदार भरउन्हात तलाठ्यांकडे, तहसील व बँकेमध्ये चकरा मारत आहेत. २४ हजार खातेदारांचे खाते क्रमांक व सात-बारा इतरांची नसलेली नावे नसल्याने त्यांच्या खात्यात अनुदान जमा झाले; मात्र ५० टक्के शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ५० टक्के निधीसाठी ७ कोटी ४० लाख ०५६६ रुपये निधीची आवश्यकता आहे. आतापर्यंत २८ कोटी ०१ लाख ३७ हजार ६६८ रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शेतकºयांच्या खात्यात पैसा वळती करण्यासाठी बँकांना कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत शासन निधी बँकेत पडून राहणार आहे.

शेतक ºयांनी आपले बँक खाते क्रमांक संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे. सात-बारावर इतर खातेदारांनी एका खात्यात पैसे देण्यासाठी अधिकार पत्र दिल्यास अनेक खातेदारांच्या बँक खात्यात वळती करण्याचे पत्र देऊ.
- पुरुषोत्तम भुसारी, तहसीलदार, बाळापूर.

Web Title: 17 thousand 442 farmers of Balapur taluka have been deprived of drought assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.