राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अकोल्यात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची ‘टू डी ईको’ चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 06:57 PM2017-11-02T18:57:45+5:302017-11-02T18:59:02+5:30

शिबिरात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी करण्यात आली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.

166 heart disease students 'two de eco' test in Akola under National Child Health Program | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अकोल्यात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची ‘टू डी ईको’ चाचणी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत अकोल्यात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची ‘टू डी ईको’ चाचणी

Next
ठळक मुद्दे७८ विद्यार्थ्यांवर होणार मुंबईत शस्त्रक्रिया


अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१७-१८ मध्ये अंगणवाडी व शाळा तपासणीच्या वेळी आढळलेल्या संशयित हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची हृदय शस्त्रक्रिया पूर्वतपासणी (टू डी ईको शिबिर)चे आयोजन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे ३० व ३१ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या शिबिरात १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी करण्यात आली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
या टू डी ईको तपासणी शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. डी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलचे डॉ. भूषण चव्हाण व डॉ. पंकज शहा यांनी १६६ हृदयरुग्ण विद्यार्थ्यांची टू डी ईको चाचणी केली. यापैकी ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. ३५ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांनी पुन्हा तपासणीकरिता सूचित करण्यात आले. चार विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही, तर उर्वरित ४९ हृदयाचा आजार नसल्याचे निदान झाले आहे. शिबिरात ७८ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून, या रुग्णांवर मुंबई येथील बालाजी व वोक्हार्ट इस्पितळांमध्ये महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शस्त्रक्रियेकरिता हृदयरुग्ण विद्यार्थ्यासोबत दोन पालक यांची अकोला ते मुंबई ने-आण करण्याची मोफत व्यवस्था जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात येणार असून, २० नोव्हेंबरपासून शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी सहकार्य केले.
 

Web Title: 166 heart disease students 'two de eco' test in Akola under National Child Health Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य