अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने दिले १६९ क्रांतिकारी वाण; स्थापनेला ५० वर्ष पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:32 PM2018-09-25T12:32:33+5:302018-09-25T12:35:22+5:30

अकोला : संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने कृषी विद्यापीठाने शेतकरी शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

 16 Revolutionary varieties given by Akola's Agricultural University | अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने दिले १६९ क्रांतिकारी वाण; स्थापनेला ५० वर्ष पूर्ण 

अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने दिले १६९ क्रांतिकारी वाण; स्थापनेला ५० वर्ष पूर्ण 

Next
ठळक मुद्दे२० आॅक्टोबर १९६९ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. आतापर्यंत ३३,९२१ विद्यार्थ्यांनी विविध कृषी विषयात येथून पदवी प्राप्त केली आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : संशोधन, शिक्षण विस्तारासह शेकडो विविध पिकांचे वाण, तंत्रज्ञान देशाला देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २० आॅक्टोबर रोजी ५० वर्ष पूर्ण होणार असल्याने कृषी विद्यापीठाने शेतकरी शिवार फेरीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येत असून, या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे.
२० आॅक्टोबर १९६९ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना झाली. २० आॅक्टोबर २०१८ रोजी स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. या ५० वर्षांत कृषी विद्यापीठाने १६९ नवे क्रांतिकारी वाण विकसित केले असून, देशातील विविध भागात शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. १,३७६ तंत्रज्ञान विकसित करू न शेतकºयांना वापरासाठी शासनाकडे शिफारशी करण्यात आल्या आहेत. तद्वतच २३ प्रकारची विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. हजारो कृषी शास्त्रज्ञ या कृषी विद्यापीठाने दिले असून, हरित क्रांती घडविण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. स्थापनेपासूत ते आतापर्यंत ३३,९२१ विद्यार्थ्यांनी विविध कृषी विषयात येथून पदवी प्राप्त केली आहे. ८,८५५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. ६५५ विद्यार्थी आचार्य पदवी घेऊन कृषी शास्त्रज्ञ बनले आहेत. शेतकरी मेळावे, विविध शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी अधिकाºयांना प्रशिक्षण देण्याचे कामही केले असून, कृषी विद्यापीठात ते अविरत सुरू आहे.
कृषी विद्यापीठाच्यावतीने २० आॅक्टोबर रोजी दरवर्षी शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही २० ते २२ आॅक्टोबरदरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे, तंत्रज्ञान, वॉटर मॉडेल, पीक प्रात्यक्षिक, विविध पद्धती वापरू न करण्यात आलेला शेती विकास, फूल, फळे, कापूस विदर्भातील शेतकºयांना बघण्यासाठी खुले करण्यात येते. या कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्याना निमंत्रण देण्यात आले आहे.


- कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात येत असून, ते या कार्यक्रमाला येतील, अशी शाश्वती आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिनिमित्त शिवार फेरीसह विविध कार्यक्रम होणार आहेत.
डॉ. विलास भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

Web Title:  16 Revolutionary varieties given by Akola's Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.