आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:17 PM2018-07-13T13:17:05+5:302018-07-13T13:19:26+5:30

अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

135 vehicles from Akola-Washim district to leave ST corporation for Ashadhi | आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

आषाढीनिमित्त एसटी महामंडळ सोडणार अकोला-वाशिम जिल्ह्यातून १३५ गाड्या!

Next
ठळक मुद्देआषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त बुधवार, १८ ते सोमवार, ३० जुलैपर्यंत विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. दोन्ही कडील तिकीट एकाच वेळी घेण्याची सुविधा महामंडळाने करून दिली आहे.वारकºयांच्या सुरक्षेच्या दिशेने विशेष काळजी घेण्यात येणार आहे.

अकोला : महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून जनता येते. आषाढी वारीनिमित्त वारकरी सांप्रदायातील भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूरची वारी करतात. राज्याची मोठी आर्थिक उलाढाल या निमित्ताने होते. सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडून विशेष रेल्वेगाड्या तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडूनही बसगाड्या सोडल्या जातात. यंदाही अकोला- वाशिम जिल्ह्यातील भाविकांसाठी १३५ बसगाड्या सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
आषाढी पंढरपूर यात्रेनिमित्त बुधवार, १८ ते सोमवार, ३० जुलैपर्यंत विशेष बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. दोन्ही कडील तिकीट एकाच वेळी घेण्याची सुविधा महामंडळाने करून दिली आहे. बसगाड्यांचे वेळापत्रक प्रत्येक आगारावर लावण्यात आले असून, वारकºयांच्या सुरक्षेच्या दिशेने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. कारंजा, मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, मूर्तिजापूर येथून जाणाºया व येणाºया गाड्या वाशिम हिंगोली-औंदा नागनाथ, परभणी, परळी, आंबाजोगई, बार्ळी मार्गे धावतील.
अकोट व तेल्हारा आगाराच्या गाड्या शेगाव, खामगाव, जालना,बीड,येरमाळा, बार्शी मार्गे धावतील. बाळापूर आगारातून जाणाºया गाड्या हिंंगोली, नांदेड, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर मार्गे धावतील.

 आगारनिहाय गाड्यांची संख्या
अकोला आगार १- १६, अकोला २-३५,अकोट -१३,कारंजा -१३,मंगरूळपीर-१२, वाशिम-३४, रिसोड-२५, तेल्हारा-११, मूर्तिजापूर-६ अशा एकूण १३५ बसगाड्या अकोला-वाशिम जिल्ह्यातून सोडल्या जाणार आहेत.

 

Web Title: 135 vehicles from Akola-Washim district to leave ST corporation for Ashadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.