पहिल्या टप्प्यात १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 03:38 PM2018-06-07T15:38:51+5:302018-06-07T15:38:51+5:30

अकोला: पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय यांच्या बदल्या, मुदतवाढीनंतर आता पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. पोलीस अधीक्षकांकडे बदल्यांची यादी तयार असून, पहिल्या टप्प्यात एकूण १३३ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

133 police personnel transfers in first phase! | पहिल्या टप्प्यात १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता!

पहिल्या टप्प्यात १३३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची शक्यता!

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दहा वर्ष, पाच वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयातून मागविण्यात आली होती. अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयाने बदल्यांसाठी १३३ कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी तयार केली आहे. त्यामुळे कोणाची बदली कुठे होते, याकडे पोलीस कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे.

अकोला: पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पीएसआय यांच्या बदल्या, मुदतवाढीनंतर आता पोलीस कर्मचाºयांच्या बदल्यांचे वारे वाहू लागले आहे. पोलीस अधीक्षकांकडे बदल्यांची यादी तयार असून, पहिल्या टप्प्यात एकूण १३३ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यादीतील १३३ कर्मचाºयांना गुरुवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजेरी लावावी लागणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दहा वर्ष, पाच वर्ष पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे पोलीस अधीक्षक कार्यालयातून मागविण्यात आली होती, तसेच अनेक कर्मचाºयांनी बदलीसाठी अर्ज केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस कर्मचाºयांमध्ये बदलीची चर्चा रंगली होती. अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयाने बदल्यांसाठी १३३ कर्मचाºयांच्या बदल्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार पहिल्या टप्प्यात १३३ पोलीस कर्मचाºयांची बदली करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली होती, तसेच काही अधिकाºयांना मुदतवाढ दिली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाºयांना बदलीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमधील पोलीस कर्मचाºयांची नावाची पहिली यादी तयार करण्यात आली असून, त्यांना बदलीसंदर्भात गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कलासागर कर्मचाºयांच्या अडीअडचणी जाणून घेत, बदल्यांची यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाची बदली कुठे होते, याकडे पोलीस कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 133 police personnel transfers in first phase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.