अनाथ मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:42 PM2018-12-14T12:42:40+5:302018-12-14T12:43:00+5:30

एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कु मारी माता बनविणाºया आरोपीस द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली.

10 years imprisonment for raping a orphan girl | अनाथ मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास

अनाथ मुलीवर बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा कारावास

googlenewsNext

अकोला : अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच अनाथ असलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिला कु मारी माता बनविणाºया आरोपीस द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोबतच आरोपीस १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान करण्यात आले आहे.
अकोट फैलमधील रहिवासी एका १५ वर्षीय मुलीवर याच परिसरात रहिवासी असलेला आकाश सिद्धार्थ काटे याने बलात्कार केला. यामध्ये मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिला ३ आॅगस्ट २०१६ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अकोट फैल पोलिसांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे अकोट फैल पोलिसांनी पीडितेचे बयाण घेऊन चौकशी केल्यानंतर आरोपी आकाश काटे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ आणि पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. द्वितीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने सात साक्षीदार तपासल्यानंतर तसेच तिघांचेही डीएनए रिपोर्ट जुळल्याचा अहवाल आल्यानंतर आरोपी आकाश काटे याला पोस्को कायद्याच्या कलम ६ अन्वये दोषी ठरवित १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीस घटना घडल्यानंतर काही दिवसांतच अटक करण्यात आली होती; मात्र त्यानंतर ४ जानेवारी २०१७ रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आरोपी बाहेर असून, त्याला आता अटक करून कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती आहे. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: 10 years imprisonment for raping a orphan girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.