निळवंडेची कामे १५ दिवसात सुरू करणार : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 05:05 PM2019-01-24T17:05:43+5:302019-01-24T17:06:16+5:30

अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची रखडलेली कामे येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येतील़ त्यासाठी प्रशासन व ठेकेदार कंपनीने आवश्यक तयारी करावी,

Will start the work of sapphire in 15 days: Vijay Shivtare | निळवंडेची कामे १५ दिवसात सुरू करणार : विजय शिवतारे

निळवंडेची कामे १५ दिवसात सुरू करणार : विजय शिवतारे

Next

अहमदनगर : अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्यांची रखडलेली कामे येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येतील़ त्यासाठी प्रशासन व ठेकेदार कंपनीने आवश्यक तयारी करावी, असे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नाशिक विभागीय आयुक्तालयात झालेल्या बैठकीत दिले़
अहमदनगर येथे निळवंडे पाटपाणी कृती समिती व जिल्हाधिकारी यांची ८ जानेवारीला बैठक झाली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तालयात बुधवारी (दि़२३) निळवंडे कालव्यांच्या कामासंबंधी शिवतारे यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक झाली़ यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी ज्योती कावरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता अलका अहिरराव, संगमनेर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बागुल, संगीता जगताप, अभियंता लव्हाट, कवडे यांच्यासह निळवंडे पाटपाणी कृती समितीचे नानासाहेब शेळके, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, सुखलाल गांगवे, विठ्ठल घोरपडे, मोहनराव शेळके, सौरभ शेळके, भाऊसाहेब शेळके, तुळशीराम मगर, शिवाजी शेळके आदी उपस्थित होते.
बैठकीत शिवतारे यांनी सर्वोच्च न्यायालयातील पिल्ले खटल्याचे उदाहरण देत भूसंपादन केलेली जमीन कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना परत करता येणार नाही, असे सांगितले़ तसेच बंद कालव्यांची मागणी ही वास्तवाला धरून नाही़ याशिवाय त्या जमिनीही वापरता येत नाहीत, असे शिवतारे म्हणाले़ अकोल्यातील शेतकºयांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न
करणार असल्याचेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Will start the work of sapphire in 15 days: Vijay Shivtare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.