तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 09:01 PM2018-04-26T21:01:15+5:302018-04-26T21:01:15+5:30

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.

Will not take bail until the investigation is completed: the sanctity of MLA Sangram Jagtap | तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

तपास पूर्ण होईपर्यंत जामीन घेणार नाही : आमदार संग्राम जगताप यांचा पवित्रा

Next
ठळक मुद्देवकिलांनी दाखल केलेला जामीन अर्ज घेतला मागे

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा आ. जगताप यांनी घेतला असल्याचे त्यांच्या वकिलांमार्फत सांगण्यात आले. त्यामुळे आ. जगताप यांचा कोठडीतील मुक्काम सध्या तरी लांबल्याचे दिसते.
केडगाव येथे दि. ७ एप्रिल रोजी दुहेरी हत्याकांडानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीवरून आ. संग्राम जगताप यांच्यावर हत्येचा कट असल्याचा गुन्हा दाखल झाला. त्याच रात्री त्यांना अटकही झाली. बारा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना बुधवारी (दि. १८) न्यायालयीन कोठडीत वर्ग करण्यात आले. त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजे दि. २५ एप्रिल रोजी जगताप यांचे वकील अ‍ॅड. महेश तवले यांनी त्यांचा जामीन अर्ज न्यायालयासमोर ठेवला. परंतु या प्रकरणी पोलिसांचा अहवाल न आल्याने सरकारी वकिलांनी या संदर्भात आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे या जामीन अर्जावर निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, संग्राम जगताप गेले २० दिवस अटकेत असून पोलिसांना अद्यापपर्यंत त्यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळालेले नाहीत. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी विशाल कोतकर यानेही या हत्येत कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग नसल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी आपला संबंधच नाही. त्यामुळे कसले पुरावेही नाहीत. पोलिसांनी आणखी तपास करावा. न्यायालयावर आपला विश्वास आहे. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत आपण जामीन घेणार नाही, असा पवित्रा घेत आ. जगताप यांनी जामीन अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचे त्यांचे वकील तवले यांनी स्पष्ट केले.

पोलीस अहवाल पुढील आठवड्यात
आमदार शिवाजी कर्डिले यांना जामीन मिळाल्यानंतर संग्राम जगताप यांनाही जामीन होईल, अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांना होती. परंतु आता संग्राम जगताप यांनीच जामीन अर्ज मागे घेतल्याने सध्या तरी त्यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस त्यांचा अहवाल पुढील आठवड्यात देणार असल्याची माहिती आहे. त्यात आ. जगताप यांचा याप्रकरणी सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले तर त्यांना जामीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Will not take bail until the investigation is completed: the sanctity of MLA Sangram Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.