अहमदनगर महापालिका : कोणाचा होणार महापौर ? भाजप, सेना की राष्ट्रवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:02 AM2018-12-28T10:02:57+5:302018-12-28T11:26:07+5:30

अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड काही क्षणात होणार आहे. महापौरपदासाठी भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर रिंगणात आहेत.

Who will be the Mayor: Wakeley, Borate? | अहमदनगर महापालिका : कोणाचा होणार महापौर ? भाजप, सेना की राष्ट्रवादी

अहमदनगर महापालिका : कोणाचा होणार महापौर ? भाजप, सेना की राष्ट्रवादी

Next

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवड काही क्षणात होणार आहे. महापौरपदासाठी भाजपाकडून बाबासाहेब वाकळे, शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर रिंगणात आहेत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सभागृहात चमत्कार होणार आहे.

भाजपाकडून बाबासाहेब वाकळे यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपाकडून मालनताई ढोणे अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या रुपाली वारे अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे महापौर पदासाठी रिंगणात आहेत. ठिक ११ वाजता निवडणुक पार पडणार आहे. सेना-भाजप युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

महापालिकेत शिवसेना(२४), भाजप (१४), राष्ट्रवादी(१८), काँग्रेस(५), बसपा(४), सपा(१), अपक्ष(२) असे पक्षीय बलाबल आहे. त्यामुळे सभागृहात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Who will be the Mayor: Wakeley, Borate?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.