घारगाव परिसरात शिवशाही बसचे चाक निखळले; चौदा प्रवासी बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:40 PM2018-09-03T12:40:11+5:302018-09-03T12:40:49+5:30

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली.

The wheels of Shivshahi bus fell in the area of ​​Gargaon; Fourteen passengers escaped | घारगाव परिसरात शिवशाही बसचे चाक निखळले; चौदा प्रवासी बचावले

घारगाव परिसरात शिवशाही बसचे चाक निखळले; चौदा प्रवासी बचावले

Next

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात नाशिक-पुणे महामार्गावर नाशिक आगाराच्या शिवशाही बसचे चाक अचानक निखळल्याची घटना सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडली. चालक बाबा बच्छाव यांच्या प्रसंगावधानामुळे चौदा प्रवाशांचे प्राण वाचले.
नाशिक आगाराची शिवशाही बस (क्ऱ एम़एच़ ०९, ईएम १२९१) पुण्याहून नाशिककडे प्रवाशी घेऊन जात असताना नाशिक-पुणे महामार्गावर घारगाव परिसरात बसचे चाक अचानक निखळले. हे चाक ३०० मीटर दूरवर जाऊन पडले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्यांने तात्काळ बस थांबवली अन् बसमधील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यात संगमनेरचे दोन प्रवाशी व नाशिकचे बारा प्रवाशी असे ऐकून चौदा प्रवाशी होते.

Web Title: The wheels of Shivshahi bus fell in the area of ​​Gargaon; Fourteen passengers escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.