यहा क्या माहोल है ? शिर्डी विमानतळावर मोदींकडून विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:53 PM2019-04-12T13:53:47+5:302019-04-12T13:56:51+5:30

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले.

What is the atmosphere here? Modi asked at Shirdi airport | यहा क्या माहोल है ? शिर्डी विमानतळावर मोदींकडून विचारणा

यहा क्या माहोल है ? शिर्डी विमानतळावर मोदींकडून विचारणा

Next

शिर्डी : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार डॉ़ सुजय विखे यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदनगरमध्ये दाखल झाले. सभा आटोपून पुन्हा ते विमानतळावर दाखल होत पुढील सभेसाठी रवाना झाले. 
        सकाळी दाखल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे काय माहोल आहे अशी विचारणा पदाधिकाऱ्यांनाकेली़ लोक आपल्याला पाहून मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील दोन्हीही जागा विजयी होतील, असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरून अवघ्या मिनीटात ते हेलिकॉप्टरने नगरकडे रवाना झाले.
नगरची सभा संपवून मोदी पुन्हा लष्कराच्या हेलिकॉप्टरने सव्वाच्या दरम्यान साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. तेथून ते विमानाने रवाना झाले़ तत्पुर्वी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, राहात्याच्या नगराध्यक्षा ममता राजेंद्र पिपाडा, जिल्हा सचिव नितीन कापसे व प्रकाश चित्ते यांनी मोदी यांना पुष्पगुच्छ देवून निरोप दिला. यावेळी शिर्डीकरांच्या वतीने राजेंद्र गोंदकर, सुजीत गोंदकर व नितीन कापसे यांनी मोदी यांनी गुजराती भाषेतील साईसच्चरित्र भेट दिले़ साईबाबा संस्थानमध्ये ५० टक्के स्थानिक विश्वस्त असावेत यासाठी आपण राज्य सरकारला सुचना कराव्या अशा आशयाचे निवेदन देण्यात आल्याचे सुजीत गोंदकर यांनी सांगितले. मोदी यांनी विमानात बसण्यापुर्वीही उपस्थित पदाधिका-यांना इकडे काय माहोल आहे, याची विचारणा केली़  एक वाजून बावीस मिनीटांनी मोदी विमानाने रवाना झाले.
विमानतळावर शिर्डीच्या नगराध्यक्षा योगिता अभय शेळके, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे, तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजुरकर, भाजपा शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, संस्थानचे विश्वस्त बिपीनराव कोल्हे, जिल्हा परिषदचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी पुष्पगुच्छ देवून मोदी यांचे स्वागत केले. तर सचिन तांबे यांनी मोदी यांना सार्इंची लहान चांदीची प्रतिमा भेट दिली.

Web Title: What is the atmosphere here? Modi asked at Shirdi airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.