शूरा आम्ही वंदिले! : चारही बाजूने शत्रू तरीही पाच अतिरेक्यांना कंठस्नान, सुरेश सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:09 PM2018-08-15T12:09:22+5:302018-08-15T12:12:06+5:30

काश्मीर राज्यातील सोनमर्ग परिसरातील जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले़ ‘आॅपरेशन रक्षक ’ असे या मोहिमेचे नाव होते.

We shouted! : Four hostile enemies, four terrorists, and Suresh Sonawane | शूरा आम्ही वंदिले! : चारही बाजूने शत्रू तरीही पाच अतिरेक्यांना कंठस्नान, सुरेश सोनवणे

शूरा आम्ही वंदिले! : चारही बाजूने शत्रू तरीही पाच अतिरेक्यांना कंठस्नान, सुरेश सोनवणे

googlenewsNext
ठळक मुद्देशिपाई सुरेश सुंदर सोनवणेजन्मतारीख २१ फेब्रुवारी १९७३सैन्यभरती २५ आॅगस्ट १९९३वीरगती २३ नोव्हेंबर १९९५सैन्यसेवा २ वर्षे १ महिना २३ दिवस​​​​​​​ वीरमाता मंडाबाई सोनवणे

काश्मीर राज्यातील सोनमर्ग परिसरातील जंगलात लपलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले़ ‘आॅपरेशन रक्षक ’ असे या मोहिमेचे नाव होते. सुरेश सोनवणे यांच्यासह जवानांची एक तुकडी पायलट विमानातून कोयलच्या दिशेने रवाना झाली. अतिरेकी लपलेल्या ठिकाणाचे लोकेशन ट्रॅक झाले. जवानांनी विमानातून जमिनीच्या दिशेने उड्या घेतल्या़ घनदाट जंगल, दगडधोंडे अशा भयाण परिस्थितीत जवानांनी अतिरेक्यांचा शोध सुरू केला़ कधी कोठून फायरिंग होईल हे सांगता येत नव्हते. तेव्हढ्यात झाडाच्या पाठीमागे सुरेश सोनवणे यांना काहीतरी हालचाल दिसली़ सहका-यांना एकाच जागेवर थांबवून ते पुढे गेले. काही अंतर जाताच झाडांवर बसलेल्या शस्त्रधारी अतिरेक्यांनी खाली उड्या मारल्या. सुरेश यांना चोहोबाजूने अतिरेक्यांनी वेढले. सुरेश यांनीही बंदुकीतून अतिरेक्यांच्या दिशेने फायरिंग केली. यात चार ते पाच अतिरेकी मारले गेले़ अतिरेक्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये सुरेश यांच्या छातीत एक गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. सुरेश सोनवणे हे देशासाठी शहीद झाले.सुरेश यांचा हा पराक्रम सांगताना त्यांची आई मंडाबाई यांचा उर अभिमानाने भरून आला होता.
शहीद सुरेश सुंदर सोनवणे यांचे कुटुंब पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे स्थायिक आहे. सुरेश यांचा जन्म मात्र वेलतुरी (ता. आष्टी) येथे २१ फेब्रुवारी १९७३ साली झाला होता. त्यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. धानोरा येथे बारावीपर्यंत शिक्षण झाले.  त्यांच्या घरची परिस्थिती बेताची़ आई-वडील मजुरी करून प्रपंच चालवित होते. सुरेश यांना लहापणापासून कुस्तीची आवड होती. त्यामुळे व्यायाम करून पिळदार शरीर कमावलेले. देशासाठी आपण काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे सैन्यदलात भरती होण्याचा सुरेश यांनी निर्णय घेतला. बारावीला असतानाच त्यांची २५ आॅगस्ट १९९३ रोजी लष्करात नियुक्ती झाली. नोकरी लागल्यानंतर ते अवघे दोन तीन वेळा गावाकडे आले. गावी आल्यानंतर ते लष्करात काम करीत असतांना जे घडत होते त्याचे किस्से ते मित्रांना सांगायचे. ड्यूटीवर असताना सुरेश घरी पत्र पाठवून खुशाली विचारायचे. सुरेश यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांची आई मंडाबाई व भाऊ युवराज सोनवणे यांना अश्रू अनावर झाले.
१९९५ रोजी सुरेश गावाकडे सुट्टीला आले होते़ काही दिवस गावी राहून ते परत काश्मीर येथे गेले. यावेळी त्यांची नियुक्ती पुलबामा जिल्ह्यातील पॅराटपू रेजिमेंटमध्ये होती़ २३ नोव्हेंबर १९९५ रोजी रेजिमेंट प्रमुखांना माहिती मिळाली की, पुलबामा जिल्ह्यातील कोयल या अतिदुर्गम असलेल्या खेडेगावातील सोनमर्ग या ठिकाणी अतिरेकी लपून बसले आहेत. माहिती विश्वसनीय होती. लपलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करण्याचे आदेश लष्करातील वरिष्ठ अधिका-यांकडून मिळाले़ ‘आॅपरेशन रक्षक ’ असे या मोहिमेला नाव दिले. जवानांची एक तुकडी पायलट विमानातून कोयलच्या दिशेने रवाना झाली. पंधरा जवान या विमानात बसलेले होते. यामध्ये सुरेश सोनवणे यांचाही समावेश होता. विमानाच्या पायलटने अतिरेकी लपलेल्या सोनमर्ग या ठिकाणाचे लोकेशन ट्रॅक केले. टार्गेट याच परिसरात असल्याच्या सूचना मिळाल्या. पायलटने आकाशात विमान स्थिर केले़ अन् या विमानातून पक्षी उडावे तसे जवान खाली जमिनीच्या दिशेने उडाले़ घनदाट जंगल, दगडधोंडे, नदीनाल्यांचे पाणी अशा भयाण परिस्थितीत जवानांच्या तुकडीने अतिरेक्यांचा शोध सुरू केला. पंधरा जणांच्या तुकडीतील प्रत्येक जण सावधतेने पाऊल टाकून अतिरेक्यांचा शोध घेत होते. कधी कुठून फायरिंग होईल हे सांगता येत नव्हते़ तेव्हढ्यात झाडाच्या पाठीमागे सुरेश यांना काहीतरी हालचाल दिसली़ त्यांनी सहका-यांना एकाच जागेवर थांबून ते पुढे गेले़. काही अंतर जाताच झाडांवर बसलेल्या शस्त्रधारी अतिरेक्यांनी खाली उड्या मारल्या. सुरेश यांना चोहोबाजूने अतिरेक्यांनी वेढले़ सुरेश यांनीही बंदुकीतून अतिरेक्यांच्या दिशेने फायरिंग केली़ यात चार ते पाच अतिरेकी मारले गेले़ अतिरेक्यांनी केलेल्या फायरिंगमध्ये सुरेश यांच्या छातीत एक गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. सुरेश सोनवणे हे देशासाठी शहीद झाले. सुरेश यांचा हा पराक्रम सांगताना त्यांची आई मंडाबाई यांचा उर अभिमानाने भरून आला होता.
२३ नोव्हेंबर १९९५ च्या पहाटे चार वाजता वेलतुरी गावातील कोतवाल सोनवणे कुटुंबीयांच्या घरी आला. सोनवणे कुटुंबीय झोपेत असतांना कोतवालाने हाक मारली त्यानंतर सुरेशचे चुलते बाहेर आले़ पोलीस पाटलाने तुम्हाला बोलावले असे सांगितले. त्यानंतर सुरेशचे चुलते पोलीस पाटलाच्या घरी गेले. त्यानंतर काही वेळातच सुरेशच्या वडिलांना हे कळताच ते आपल्या बंधूच्या मागे पोलीस पाटलाच्या घरी गेले. परंतु पोलीस पाटलाने घराला आतून कडी लावून घेतली होती. त्या घरात एक लष्करी अधिकारी उपस्थित होते. त्यांनी सुरेशच्या चुलत्याला सुरेश शहीद झाल्याचे सांगितले. त्यानंतर ते आपल्या घरी आले. तोपर्यंत संपूर्ण सोनवणे कुटुंबीय जागे झाले होते. काय झाले हे चुलत्यांना विचारताच त्यांना रडू कोसळले व त्यांनी आपला सुरेश धारातीर्थी पडला असे सांगताच सर्वांनी एकच टाहो फोडला. २३ नोव्हेंबर १९९५ ची पहाट आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळून देश रक्षणासाठी पाठविणा-या वीरमाता मंडाबाई यांचेसाठी काळपहाट ठरली. त्यानंतर शासकीय इतमामात सुरेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ब्रिगेड कमांडर मॅथ मॅनन यांनी शहीद सुरेश यांच्या शौर्याबद्दल गौरवोद्गार काढले.
गुरूवारचा संयोग
सुरेश हे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची आर्मीत नियुक्ती झाली.त्यांचे लग्न झालेले नव्हते. योगायोग असा की त्याचा जन्मवार गुरूवार, आर्मीमध्ये भरती झाला तो वार गुरूवार आणि त्याला वीरमरण सुध्दा गुरूवारीच आले हे विशेष.
वेलतुरीत उभारला पुतळा
सुरेश सोनवणे हे शहीद झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि महाराष्ट्र शासनाने सोनवणे यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपयांचा धनादेश दिला. जम्मू-काश्मीर सरहद्दीवर अतिरेक्यांशी लढा देत वीरगती प्राप्त झालेल्या आपल्या लाडक्या मुलाची स्मृती रहावी म्हणून त्या वीरमातेने आपले अश्रू गिळत ग्रामीण भागातील मुलांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून वेलतुरी या मूळगावी त्याचा पुतळा उभा केला. गावक-यांनीही मोठी साथ दिली. गावामध्ये सातवीत पहिल्या येणा-या विद्यार्थ्याला ही वीरमाता दरवर्षी बक्षीस म्हणून काही रक्कम देत आहे . ग्रामीण भागातील मुलांनी व्यसनाच्या मागे न लागता देशसेवा करावी असे त्या आवर्जून सांगतात.

-शब्दांकन : उमेश कुलकर्णी



 

Web Title: We shouted! : Four hostile enemies, four terrorists, and Suresh Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.