प्रवराचे पाणी लोकवस्तीत घुसले; शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 01:35 PM2017-09-22T13:35:09+5:302017-09-22T13:35:23+5:30

Water of water entered the public; Hundreds of people moved to safer places | प्रवराचे पाणी लोकवस्तीत घुसले; शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

प्रवराचे पाणी लोकवस्तीत घुसले; शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

Next

बेलापूर (अहमदनगर) : बुधवारी झालेल्या पावसामुळे प्रवरा नदीला अचानक पाणी वाढल्यामुळे नदी काठच्या सुमारे शंभर लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे़
गुरुवारी प्रवरा नदीचे पाणी वाढल्यामुळे नदीकाठावरील उक्कलगाव व बेलापूर परिसरातील लोकांचा यामध्ये समावेश आहे़ त्यांची प्राथमिक शाळेत त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात आली आहे़ ग्रामविकास अधिकारी चांदे यांनी तेथील रहिवाशांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना दिल्या होत्या़ परंतु स्थानिकांनी दुर्लक्ष केले़ त्यानंतर सरपंच भरत साळुंके यांनी लोकांची पर्यायी ठिकाणी व्यवस्था केली. त्याच रात्री दिघी रस्त्यावरील बंधारा फुटला़ येथील रहिवाशांना रात्री अकरा वाजता सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यावेळी सरपंच भरत साळुंके. जि.प. सदस्य अरुण नाईक, विजय शेलार, नंदू शेलार, भाऊ डाकले, जावेद शेख, राजेंद्र टिक्कल, राजेंद्र गाडेकर, सीताराम गायकवाड, किरण खरोटे, सचिन नगरकर, विवेक वाबळे, असिफ शेख, कामगार तलाठी परते आदी उपस्थित होते. रात्री अकराला स्थलांतर केलेल्या सुमारे शंभरहून अधिक रहिवाशांची भोजनाची व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. यावेळी विशाल आंबेकर, अभिजित राका, सतीश सोनवणे, राजेश कटारिया यांनी काम पहिले़

Web Title: Water of water entered the public; Hundreds of people moved to safer places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.