पाथर्डीत जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:44 PM2019-06-16T12:44:12+5:302019-06-16T12:44:16+5:30

नाथसागर जलाशयातून पाथर्डी शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता रामगिर बाबा टेकडीच्या पायथ्याशी फुटली असून यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.

Water washed by thousands of liters of water, due to rupture of water | पाथर्डीत जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

पाथर्डीत जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

Next

पाथर्डी : नाथसागर जलाशयातून पाथर्डी शहरासह ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जल वाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता रामगिर बाबा टेकडीच्या पायथ्याशी फुटली असून यामुळे हजारो लीटर पाणी वाया गेले.
पाथर्डी शहरासह ग्रामणी भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी रविवारी सकाळी अकरा वाजता फुटली असून गेल्या वेळीच दुरुस्ती अभावी माहिती देवूनही जिल्हापरिषद पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी दुरुस्ती साठी फिरकले नाही यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले. पाणी वाहत असल्याने महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐन दुष्काळी परिस्थिती मध्ये पाण्या अभावी गावोगावी पाण्याची टंचाई भासत असतानी पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जी पणा मुळे पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे.

पाथर्डी शहरासह दुलेचांदगाव, माळेगाव, खेर्डे यासह आणखी काही गावाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे ठिकठिकाणी फुटत असल्याने गावातील उंचावर असलेल्या पाण्याच्या टाक्यात पुरेसे पाणी पोहचत नसून अपु-या पाणीपुरवठ्यामुळे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकानहुन पाणी आणावे लागत आहे. जलवाहिनी जुनाट झाल्याने व काही ठिकाणी उपद्रवी लोकांनी वाहिनीला छिद्र पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. यामुळे या वहिन्यावर असणा-या ग्रामपंचायती व नागरिक त्रस्त झाले आहेत.नेहमी कमीदाबाने,अपुरा व अस्वच्छ होणा-या पाणीपुरवठयास वैतागलेल्या ग्रामपंचायतीनी प्रशासनाच्या विरुद्ध आंदोलनाच्या तयारीत असल्याचे समजते.
 

Web Title: Water washed by thousands of liters of water, due to rupture of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.