नगरमध्ये पाणी उपशावरून दंगल; २० शेतकरी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 04:16 AM2019-05-26T04:16:00+5:302019-05-26T04:16:11+5:30

घोड धरणातील पाणी उपशावरून शनिवारी दुपारी वडगाव शिंदोडी व येळपणे येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात दंगल होऊन दगडफेकीत २० शेतकरी जखमी झाले.

Water turbulence in city; 20 farmers injured | नगरमध्ये पाणी उपशावरून दंगल; २० शेतकरी जखमी

नगरमध्ये पाणी उपशावरून दंगल; २० शेतकरी जखमी

Next

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : घोड धरणातील पाणी उपशावरून शनिवारी दुपारी वडगाव शिंदोडी व येळपणे येथील शेतकऱ्यांच्या दोन गटात दंगल होऊन दगडफेकीत २० शेतकरी जखमी झाले. दहा मोटारसायकलींसह जलवाहिनी, वीज मोटारीचे पॅनल बॉक्सची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत किराणा दुकानातील साहित्याचे नुकसान झाले.
दंगलीची माहिती समजताच पोलीस उपअधीक्षक संजय सातव व निरीक्षक अरविंद माने यांनी जादा पोलीस कुमक घेऊन घटनास्थळी पोहोचत दंगल आटोक्यात आणली. सातव यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांची बैठक घेतली शांततेचे आवाहन केले. त्यावर दोन्ही गटांनी पुन्हा वाद घालणार नाही, अशी हमी दिली.
घोड धरणावर वडगाव शिंदोडी, येळपणे येथील सुमारे शंभर शेतकऱ्यांच्या एकाच ठिकाणी जलवाहिन्या आहेत. धरणाची पाणी पातळी खाली गेल्याने पाण्यासाठी वादावादी सुरू झाली आहे. वडगावच्या शेतकºयांनी शुकवारी सकाळी येळपणे येथील शेतकºयांच्या वीज मोटारी बंद करून काही मोटारींचे पाईप फोडले. त्यावर येळपणेचे शेतकरी संतप्त झाले. त्यांनी बेलवंडी पोलिसात तक्रार केली.

Web Title: Water turbulence in city; 20 farmers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.