काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:59 PM2017-12-26T12:59:36+5:302017-12-26T20:50:08+5:30

श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले.

 Water released from Shrongonda city to get a touch of water | काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

काकस्पर्श होण्यासाठी श्रीगोंदा शहरामधील बंधा-यातून सोडले पाणी

Next
ठळक मुद्देलोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात दशक्रिया विधीच्या वेळी काकस्पर्श होत नसल्याने सत्ताधारी - विरोधकांनी एकत्र येऊन बंधा-यातील पाणी सोडून दिले. शहरातील गोरे मळा बंधा-यातील लाख मोलाचे पाणी सोडून देण्यात आले. एकिकडे शासन पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवत असताना दुसरीकडे काकस्पर्र्शासाठी बंधा-यातील पाणी सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाणी सोडून दिल्याने काकस्पर्श होईल का यावरही उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सोमवारी सायंकाळी गोरे मळा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले. यावेळी सतीष मखरे, राजू गोरे, अशोक आळेकर, एम.डी. शिंदे उपस्थित होते. श्रीगोंदा शहरातील सरस्वती नदीवर गोरे मळा बंधारा  आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने बंधा-यातील पाणी दशक्रिया ओट्यापर्यत आले होते. या पाण्यावर शेवाळ साचल्याने दशक्रिया विधी करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे निवडक लोकांचे म्हणणे होते. या शेवाळयुक्त पाण्यामुळे काकस्पर्श होत नाही त्यामुळे बंधा-यातील पाणी सोडून देण्याची भुमिका सत्ताधारी व विरोधकांनी घेतली. त्यानंतर बंधा-यातील पाणी सोडून देण्यात आले. बंधा-यातील पाणीसोडल्याने नेमके काय साध्य होणार आहे असा सवाल सरस्वती नदी सुशोभीकरणाचे प्रवर्तक गोरख आळेकर यांनी उपस्थित केला आहे.

लोकवर्गणीतून बंधा-याचे काम -
उन्हाळ््यात या परिसरात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत गेल्या वर्षी लोकवर्गणीतून गोरे मळा बंधा-यासाठी ८ ते १० लाख रुपये खर्च केले. या माध्यमातून सरस्वती नदीमधील गाळ काढून रुंदीकरण करण्यात आली. या कामासाठी शासनाने कसल्याही प्रकारची मदत केली नाही.

Web Title:  Water released from Shrongonda city to get a touch of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.