विधीवत पूजा करत वाकळे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:52 PM2019-01-01T12:52:09+5:302019-01-01T12:52:19+5:30

महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांनी विधीवत पूजा करत पदभार स्वीकारला

Wakale Puja was accepted by the Vidyivit Puja, but he took charge of the post of Mayor | विधीवत पूजा करत वाकळे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

विधीवत पूजा करत वाकळे यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

googlenewsNext

अहमदनगर : महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे यांनी विधीवत पूजा करत पदभार स्वीकारला. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वाकळे आणि ढोणे यांनी पदभार स्वीकारला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्याने अहमदनगर महापालिकेत पहिल्यांदा भाजपचा महापौर व उपमहापौर झाला. आज विधीवत मंत्र्त्रोच्चार करत वाकळे यांनी पदभार स्वीकारला. लक्ष्मीकांत देवदास कापडे यांनी पूजा केली. महापौरांच्या खुर्चीला पुष्पहार अर्पण करून अभिषेक केला. त्यानंतर वाकळे खुर्चीवर विराजमान झाले. यावेळी खासदार दिलीप गांधी उपस्थित होते. या पूजेनंतर खासदार गांधी यांनी वाकळे यांचा सत्कार केला. यावेळी भाजपचेही मोजकेच नगरसेवक उपस्थित होते.

मोजकेच नगरसेवक उपस्थित
पदभार स्वीकारताना राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक गैरहजर होते. शिवसेनेचे नगरसेवक आणि काँग्रेसचे नगरसेवकही गैरहजर होते.

Web Title: Wakale Puja was accepted by the Vidyivit Puja, but he took charge of the post of Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.